Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

भाजपा धुळे जिल्हाध्यक्षपदासाठी शिल्लक चारही उमेदवारांची नावे प्रदेशाध्यक्षंकडे रवाना




धुळे येथे होती निवडप्रकिया


धुळे (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाध्यक्षपदासाठी एकुण दहा जणांनी उमेदवारी जाहिर केली होती माघारीअंती बबनराव चौधरी, प्रा. अरविंद जाधव, नारायण पाटील, संजय शर्मा या चार जणांची उमेदवारी काय राहिल्याने एकमत होवु न शकल्याने जिल्हा कोअर कमेटीने चारही जणांची नावांची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांचाकडे पाठविण्यात आली आहेत. प्रदेशाकडुन जिल्हाध्यक्षाची नावाची घोषणा होईल असे विभाग संघटनमंत्री अॅड. किशोर काळकर यांनी धुळे येथील एस. व्ही. के. एम. (माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांचा) संस्थेत शुक्रवारी जिल्हाध्यक्ष निवड बैठकीत जाहिर केले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, खा. डाॅ. हिनाताई गावीत, आ. काशीराम पावरा  भाजपा उत्तर महा. विभागीय संघटनमंत्री अॅड. किशोर काळकर, निवडणुक निर्णय अधिकारी प्रा. सुनिल बच्छाव, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, जि. प. माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, शिवाजीराव दहिते, यांची प्रमुख उपस्थितीत होती.

जिल्हाध्यक्षपदासाठी एकुण दहा उमेदवार होते त्यातील वसंतराव बच्छाव, आनंदा पाटील, भाऊसाहेब देसले, प्रा. विजय देसले, धर्मराज सोनवणे, शांतराम पाटील या सहा जणांनी  माघार घेतली होती. मात्र बबनराव चौधरी, प्रा. अरविंद्र जाधव, नारायण पाटील, संजय शर्मा यांनी माघार घेतली यांचापैकी कोणीच माघार घेतली नाही त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवड जाहिर होवु शकली नाही निवडणुक अधिकारी प्रा. सुनिल बच्छाव यांनी  तर सय्याक म्हणून जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी यांनी निवडणूकीचे कामकाज  केले. 

यावेळी प्रदेश सदस्य प्रदेश सदस्य अॅड. संभाजीराव पगारे, माजी संघटनमंत्री भिमसिंग राजपुत, जि. प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, देवेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जि. प. कृषी सभापती बापु खलाणे, महिला बालकल्याण सभापती सौ. धरती देवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस कामराज निकम, अरुण धोबी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. संजिवनी सिसोदिया, धुळे पं. स. सभापती विजय पाटील, शिरपूर पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा,  शिंदखेडा पं. स. सभापती सौ. वैशाली पाटील आदींची उपस्थिती होती.

   यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 
  याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, प्रदीप कोठावदे, अॅड. राहुल पाटील, जिल्हा चिटणीस सौ. सविता पगारे, संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा. रमेश खैरनार, साक्री तालुध्यक्ष संजय अहिरराव, पिंपळनेर अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, शिरपुर तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम भदाणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. चंद्रकला सिसोदिया, अनु. जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायणसिंग जमादार, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष फिरोजअली सैय्यद यांचासह विविध आघाडी, मोर्चा जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक, बुथ अध्यक्ष, सक्रीय सदस्य आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध