Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०
हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन
चोपडा(प्रतिनिधी)शिवसेनेचे शिलेदार व लढवय्या हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना व युवासेनेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चोपड्याचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हा प्रमुख दिपकसिंग जोहरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र पाटील,शहर प्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन,शिवसेना महिला जिल्हा संघटक रोहिणी पाटील,तालुका संघटक मंगला पाटील,नगरसेवक महेंद्र धनगर,न.पा गटनेते भैय्या पवार,नगरसेवक राजाराम पाटील,प्रकाश राजपुत,माजी मनसे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वानखेडे,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील तालुका संघटक सुकलाल कोळी,शशिकांत कन्हैया,सुनील बडगुजर,बबलू पालिवाल,ऍड. सचिन पाटील,शाम परदेशी,युवासेना उपजिल्हाप्रमुख दिपक चौधरी,शहर संघटक प्रदीप बारी,नंदु गवळी,सुभाष अहिरराव,पंकज चौधरी,विलास सुर्यवंशी मनोज माळी,चंद्रकांत महाजन,जगदीश मराठे,विजय महाजन,कमलेश बडगुजर,दिपक माळी,राहुल मराठे,गणेश कन्हैया,भैय्या कन्हैया यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते
यावेळी हुतात्मा वीर कन्हैया बंधू प्रतिष्ठान तर्फे उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तसेच वेले येथील अमर संस्था संचालित बालकाश्रम व वृद्धाश्रम येथे बालकांना तथा वृद्धांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चौकटीत घेणे १३ फेब्रुवारी १९८६ हा दिवस चोपडा शिवसेनेसाठी काळा दिवस ठरला कारण हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया पोलीस स्टेशन येथे त्यांचे वर्चस्व सहन न झाल्यामुळे हत्या करण्यात आली परंतु त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांच्या रक्तातून हजारो शिवसैनिक उदयास येऊन त्यांनी ३ वेळेस चोपडयात आमदारकी चा भगवा फडकवत हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया यांना अभिवादन केले आहे.या पुढे हि शिवसेनेचा भगवा फडकत राहील हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी शिवसैनिकानी ग्वाही घेतली -आबा देशमुख-शहर प्रमुख चोपडा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा