Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबंध होत असून त्यांचा साखरपुडा आज नंदुरबार येथे होत आहे.
डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबंध होत असून त्यांचा साखरपुडा आज नंदुरबार येथे होत आहे.
नंदुरबार:प्रतिनिधी:नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबंध होत
असून त्यांचा साखरपुडा आज नंदुरबार येथे होत आहे. डॉ. वळवी हे वैद्यकीय पदव्युत्तर असून ते मूळचे हातधुई (ता. धडगाव जि. नंदुरबार) येथील आहेत. मुंबईत ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.
खासदार डॉ.हिना गावित यांचा जन्म 28 जून 1987 ला झाला असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस एमडी झाले आहे. त्यांचे वडील माजी मंत्री व व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आहेत डॉ. हिना या वैद्यकीय शिक्षण घेत असताना मार्च 2014 मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला व प्रथमच नंदुरबार लोकसभा निवडणूक लढवली. आणि त्यांनी कॉंग्रेसचे सलग नऊ वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा दणदणीत 1 लाख 6905 मतांनी पराभव करीत इतिहास रचला. त्या सर्वात तरुण आणि उच्च शिक्षित खासदार ठरल्या. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा 2019 मध्ये त्या भाजपकडून खासदार म्हणून निवडून आल्या. संसदीय कामकाज करताना त्यांनी आरोग्य तसेच कुपोषणाच्या विषयावर मुद्देसूद मांडणी करत संसदेचे लक्ष वेधून घेतले.
आदिवासी भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी उज्वला गॅस योजना अंतर्गत दीड लाखावर गॅस वितरण केले. खासदार गावित यांनी आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, न्यूझीलॅंड, सिंगापूर, इंग्लंड, स्वित्झर्लंड आदी देशांचे परदेश दौरे संसदीय मंडळाच्या बरोबर केले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत पंतप्रधान मोदी यांच्या गूड बुक मध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या संसदीय कामाची दखल घेत सलग पाचव्यांदा त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांना वाचन भारतीय क्लासिकल संगीत ऐकणे तसेच आदिवासी भागात सामाजिक कार्य कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करायला आवडते.
*****************************
जाहिरात
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा