Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

समाजक्रांती ही डोळस पणाची असावी:- श्री अर्जुनभोई मुंबई




भोई समाज तरुण बंधु भगिनीनो,
आपणास सप्रेम जय भोई राज... समाजपातळीवर सामाजिक सेवा करतांना समाजात समाजक्रांतीचा अर्थ मनात सुस्पष्ट असला तरच त्याच्या वापरण्याला काही तरी अर्थ प्राप्त होतो. तो वापरणाऱ्याच्या मनात अर्थ अस्पष्ट असेल तर समाजक्रांती शब्द वापरणा-या माणसाची कीव कराविशी वाटते आणि त्यातुनच समाजक्रांती हा शब्द आपले सामर्थ्य गमावून बसतो की काय अशी शंका यावयास लागते. 

तेव्हा समाजक्रांती या शब्दाचा व्यवहाराच्या पातळीवर अर्थ समजून घेणे व त्यानंतरच त्याचा वापर करणे हे समाजक्रांती करिता महत्वाचे ठरणार आहे. समाजसेवेच्या पातळीवरुन राजकीय क्षेत्रात समाजक्रांती या शब्दाचा वापर सर्रास केला जातो व तोही या शब्दाचा अर्थ न समजून घेता. क्रांतीचा पारसी पर्यायवादी शब्द इन्कलाब आहे व इंग्रजीमध्ये रिव्होल्युशन... जेव्हा समाजक्रांतीच्या विरुद्ध प्रतिक्रांतीवाले समाजाची स्थिती ही अडाणीपणाची जशी आहे तशीच राहावी व अशा स्थितीतही सदरच्या स्थितीचा गर्व लोकांनी गवगवाच्या रुपात करावा अशी धारणा ठेवून आपल्या मोर्चामध्ये ते समाजक्रांती अमर रहे... असे नारे देतात तेव्हा या कृत्याला त्यांचे क्रांती संबंधी अज्ञानच आहे असेच समजावे लागेल. एक अज्ञानी नेता मोर्चातील अज्ञानी लोकांना क्रांतीबद्दल काय सांगू शकणार? आणि अशावेळी अज्ञानी जनतेवर आपलं गारुड बसविण्याकामी ते नविन नविन शक्कल लढवुन समाजमनावर आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. 

म्हणून समाजघटक हो, क्रांती ही डोळस पणाची असावी, ती समजून घ्यावी, तिचा उद्देश व अर्थ समजून घ्यावा नाही तर आपल्या समाजपटलाचे काही ही खरे नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध