Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०
शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; माथेफिरू तरुणाचा प्रताप
हिंगणघाट (वर्धा)प्रतिनिधी: नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरूण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे कृत्य एका माथेफिरू तरुणाने केल्याचे सांगण्यात येत आहे.
माथेफिरू तरूणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना सकाळी 7.30 वाजता नंदोरी चौकात घडली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
तसेच, या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकेश नगराळे (रा. दारोडा) फरार झाला आहे. तर विकेश नगराळेसोबत अन्य दोन युवक असल्याची माहिती समोर येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा