Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

शिरपुर तालुका पोलीस ठाण्याची कार्यवाहीत लक्झरी बस सह ३१.४२० किलो.वजनाचा सुका गांजा असा एकूण २,५१,३६० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत




धुळे:प्रतिनिधी:दिनांक १४/०२/२०२० रोजी रात्री.१.०० वाजेच्या सुमारास शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारा मार्फत अशी माहिती प्राप्त झाली की, नाशिक कडुन राजस्थान येथे जाणाऱ्या लक्झरी बस मध्ये काही महिला मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ हे चोरुन लपुन तस्करीचे मार्गाने घेवुन निघाल्या आहेत.

सदर प्राप्त गुप्त माहितीच्या अनुशंगाने स.पो.नि.अभिषेक पाटील, यांनी शिरपुर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन हाडाखेड गावाचे शिवारात शिरपुर कडुन येणाऱ्या राष्टीय महामार्ग क्रं.३ वर विनायक हॉटेल येथे सापळा रचुन पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास एक संशयीत लक्झरी बस क्रमांक आर जे. ३० पी.बी.०९९९ हीची तपासणी केली असता सदर बस मध्ये प्रवास करणाऱ्या पैकी संशयीत महिला नामे 
१) यमुना शरीफ अंभगे वय- २५ रा.महाराणा चौक , कंजरवाडा नंदुरबार 
२) कोमल दिपक गागडे वय-२२ राहणार.महाराणा
चौक , कंजरवाडा नंदुरबार ह.मु. पोपटी कॉलनी सिध्दार्थ नगर ठाणे इस्ट जि.ठाणे
३) कुलता संजय बाडुंगे वय-२८ राहणार. महाराणा चौक ,कंजरवाडा नंदुरबार यांचे ताब्यात असलेल्या बँग मधुन प्रत्येकी सुमारे १० किलो सुका गांजा आढळुन आला. सदर तिन्ही महिलांकडुन खालील प्रमाणे मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१)२,५१,३६०/-रू. किमतीचा ३ ट्रॅव्हल्स बॅगेत प्रत्येकी २ बंडल या प्रमाणे प्लॉस्टीकचे आवरणात पॅकीग असलेले एकुण ६ बंडल त्यात थोडा ओलसर असलेला हिरवट पिवळसर रंगाचा सुकलेले पाने, बिया, काङ्या असलेला
उग्रवासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ एकुण ३१.४२० किलो.वजनाचा
वरील प्रमाणे माल हस्तगत करण्यात आला असुन वरील तिन्ही महिलांना ताब्यात घेतले असुन त्याचे विरुध्द पो.हे.का./कैलास माणिक पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा
दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास. पो.स.ई. दिपक वारे हे करीत आहेत.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री.विश्वास पांढरे. अपर पोलीस अधिक्षक श्री.राजु भुजबळ  व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर श्री.अनिल माने . यांचे
मार्गदर्शना खाली स.पो.नि. अभिषेक पाटील, असई. नियाज शेख, पो.हे.का. कैलास पाटील, संजय देवरे ,पो.ना.संजीव जाधव पो.कॉ.आरीफ पठाण ,राजीव गिते, व महीला पोलीस कर्मचारी अश्विनी चौधरी, सुनिता पवार यांनी कार्यवाही केली आहे. पुढील तपास  शिरपूर पोलीस करीत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध