Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
नरढाणा पोलीसांनी हजारो रुपयाच्या दारुसाठासह एक कार पोलीसांनी जप्त केली
धुळे : प्रतिनिधी: नरडाणा पोलीसांना सकाळी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मुंबई आग्रा महामार्गाने शिरपूर कडून धुळ्या कडे येणारी कार नं. एम.एच-१५ /
एफ.वी - ०४५० हिच्यात दारुची बेकायदेशीररित्या वाहतूक होत आहे अशी माहिती मिळताच
आज दि. ४/२/२०२० रोजी दुपारी ०३.१३ वाजेच्या सुमारास नरडाणा जुना टोल नाका येथे शिरपूर कडून धुळे कडे जाणा-या मुंबई-आग्रा महामार्ग वर दवा धरुन थांबले असता वरील नमूद
नंबरची कार पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने कार सुसाट वेगाने सोनगीरकडे पळ काढला त्याचा पाठलाग करुन सोनगीर पोलीसांच्या मदतीने सदर कार थांबवून पाहाणी करता असताना कारच्या मागील डिक्कीत
१) बॉम्बे व्हिस्की विदेशी दारुचे एकूण ५
खोके,
२) मॅगडॉल नं. १ व्हिस्कीचा एक खोका ४) इंम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचा एक खोका असा एकूण ४५,१२०/-रु. किंमतीची विदेशी दारु व ३,५०,०००/-रु. किंमतीची टोवॅटो कंपनीची कार असा एकूण ३,९५,१२० मुद्देमाल मिळून आल्याने कार चालक राहूल राजेंद्र चौधरी रा. दोंडाईचा याचे विरुध्द नरडाणा पो.स्टे.ला गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक - विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक, राजू भुजबळ,पोलीस अधिकारी, शिरपूर, अनिल माने,
यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यवाही नरडाणा पो.स्टे. सपोनिरी योगेश राजगुरु, प्रकाश माळी, रामेश्वर सुर्यवंशी, योगेश सोनवणे, या पथकाने केली असून पुढील तपास नरडाणा पोलीस करीत आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा