Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

हुंडाघेण्याच्या पद्धतीला झुगारुन भोई समाजात केला एक नवा आदर्श




जळगांव प्रतिनिधी:आज ही राज्यातील समाजात अनेक चांगल्या व काही समाजघातक चालीरिती होतांना आपण पाहतो. त्यातील एक म्हणजे विवाह पध्दतीत वधूच्या पित्याकडून लग्नात हुंडा हा रकमेच्या स्वरुपात स्वीकारणे... वधु पक्षाकडून रकमेच्या स्वरुपातील हुंड्यासाठी काही मंडळी ही तर आपल्या अगदी मतावर ठाम राहतात त्यातुनच वधुपक्षाकडील चांगल्या विचार सरणीची माणसे ही एकमेकांपासुन दूर जात असतांना दिसतात.

तर काही ठिकाणी ह्याच हुंड्याच्या पध्दतीला ठोकर मारुन समाजात सरकार राबवत असलेल्या हुंडा प्रतिबंधक कायद्याला सहकार्य करतांना, समाजात एक नवा आदर्श  निर्माण करतांना दिसतात. लोहारा येथील समाजसेवक खान्देशभुषण समाजगौरव महाराष्ट्र समाजभुषण या पुरस्कारांनी सन्मानित अर्जुन रामचंद्र भोई यांचे शिरलेली ता/जिल्हा जळगांव येथील दाजी-पाहुणे अरुण भगवान भोई व त्यांची मोठी बहीण सौ आशाबाई अरुण भोई यांच्या मुलाचे नगरदेळा तालुका पाचोरा येथील कै अशोक किसन शिवदे यांची तृतिय कन्या पाहण्यातुन नातेसंबंधाचा विवाहाचा योग जोडून आला होता; 

परंतु वडील मयत असल्याने व लहानभाऊ हा आता महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने घरची परिस्थिती ही बेताची कमविता व्यक्ति नसल्याने फारच बिकट असल्याचे दिसून आली शिरसोलीकर अरुण भगवान भोई यांनी वधु पक्षाकडील काही चालीरितीच्या पध्दतींना तसेच हुंडा पध्दतीला तिलांजली देऊन लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम हा शिरसोली येथे घेण्याचे ठरवले आणि लग्नाच्या पुर्वीचे व लग्नातील मानपानाचे सोपस्कार न ठेवता विवाह हा साध्या पद्धतीने शिरसोली येथेच करुन त्यांनी राज्यातील भोई समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. 

आमच्या तरुण गर्जना वृत्तपञाच्या वार्ताहराशी वरपिता अरुण भगवान भोई यांनी हुंडा नाकारतांना सांगितले की, माझी मुलगी तशी ती समोरच्याची पण मुलगी... आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी वधु पित्यावर हुंडा पध्दतीने काय प्रसंग गुजरतात ते आम्ही स्वत: अनुभवल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळेच आम्ही हुंडा बंदीचा निर्णय आमच्यासाठी घेतल्याचे सांगितले. अरुण भगवान भोई यांची श्रीरामपूर येथे मोठी मुलगी दिल्याचे व शिरसोली येथे चणेफुटाणे सरबत गोला विकण्याचा त्यांचा साधा व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले. 

या शुभमंगल प्रसंगी शिरसोली येथे अर्जुनभोई मुंबई अल्काताई घाटेठाणे सुकलाल भोई नगरदेवळा तलाठीअप्पा जामनेर चावदस लांबोळे गुरुजी शिरसोली रविंद्रभोई रेणाबाईशिवदे गोविंदराव लांबोळे नेरीबु।। उत्तम सुर्यवंशी ओझर भगवानभोई, आनंदाभोई, मोहनशिवदे मंगलदासघाटे राजारामभोई संपर्क टीम लोहारा दिनेशभोई अमरावती महारु शिवदे संजयभोई सत्यमतमखाने टीम जळगांव पारसभोई कोपरगांव सचिननंदाने फैजपूर विजयभोई वरखेडी गोविंदराव वाडीले दोंडाईचा इत्यादींसह अनेक समाजसेवक यावेळी हजर होते. समाजसेवेच्या कार्यातून अनेक मंडळींचे समाज प्रबोधन पर विचार मिळाल्याचे तसेच हुंडाबंदी पध्दत ही आजची काळाची गरजच आहे असे ही अरुण भगवान भोई यांनी सांगितले. 

शिरसोली परिसरातील बारी पाटील कोळी कुंभार बडगुजर तेली माळी पिंजारी मारवाडी जैन इत्यादी स्थानिक समाजातील समाज बंधुभगिनींनी सदर कृतीचे स्वागत केल्याचे समजते. हुंडाबंदी पध्दत स्वीकारणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे का? तर ही अयोग्य बाबच असल्याचा परिसरातील बोलण्यातुन समोर येत आहे.


२ टिप्पण्या:

प्रसिद्ध