Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

तंटामुक्ती अध्यक्ष पदी देवानंद तायडे यांची बिनविरोध निवड (अध्यक्ष पदांसाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींना दिले जाते प्राधान्य, पाटील, बारी, बौद्ध, मातंग, चांभार, मुस्लिम, सुतार, नाथ आदी समाजाने भोगले अध्यक्ष पद )


संग्रामपूर:प्रतिनिधी:तालुक्यातील वरवट बकाल य येथील ग्रामपंचायतीची आज 6 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील प्रतिष्ठित नागरिक देवानंद जगगनाथ तायडे  यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  

माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील ताण कमी व्हावा ह्यासाठी निर्माण झालेल्या गृहखात्याच्या संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आजपर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावे अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत. 

वरवट बकाल येथील ग्रामसभेत दरवेळेस प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची नावे सुचविल्या जातात व एकमताने तंटामुक्ती अध्यक्षाची निवड केली जाते. ग्रामपंचायत कडून तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद तायडे यांचा सत्कार करण्यात आला असून माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष इघोकार यांचा पण सत्कार करण्यात आला. ह्यावेळी सरपंच श्रीकृष्ण दातार, काँग्रेसचे नेते श्याम डाबरे, पत्रकार प्रल्हाद दातार, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाबूलाल इंगळे, माजी सरपंच संतोष पवार, संतोष टाकळकार, गिरीधर ढगे, राजु राठोड, शेख महेमुद, शिवसेनेचे प्रल्हाद अस्वार, भगवान पवार, रामदास बावस्कर, सचिव बोडखे, अशोक टाकळकार,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध