Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०
पातोंडा मठगव्हाण शिवारात वृक्षांची राजरोसपणे होतेय कत्तल !
प्रतिनिधी:पातोंडा:एकीकडे सरकार झाडे जगवा चा नारा देवून दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचे संकल्प करीत आहेत, गावोगावी सामाजिक वनीकरण निर्माण केले जात आहेत व सामाजिक संस्था व वैयक्तिक स्तरावर ही वृक्ष लागवड होऊन संगोपन होत असताना पातोंडा मठगव्हाण रोडवरील पातोंडा, मठगव्हाण व रुंधाटी शिवारातील शेतातील डेरेदार निंबाची व बाभुळची वृक्षांची धरणगाव येथील अज्ञात
इसमाकडून रोजरोसपणे दिवसा कत्तल होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना वाटत होते की कुणी शेतकऱ्याने त्याच्या शेतातील झाडे दिली असतील हा गैरसमज त्यांच्या मनात असल्याने त्यांनी संबंधित वृक्ष कत्तल करणाऱ्यांना अडवले नाही अथवा विचारले नाही. पण आज दुपारी रुंधाटी येथील शेतकरी नरेंद्र पवार हे शेतात गेले असताना त्यांनी त्या कत्तल करणाऱ्या व्यक्तींना विचारणा केली असता त्यांनी
उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यांचे वाहन अडवून ठेवले .त्यावर त्यांची बाचाबाची होऊन परिसरातील शेतकरी जमा झाले. आणि ते वृक्षतोड करणारे त्यांचे ट्रॅक्टर घेऊन त्यांनी तेथून पळ काढला. शेतकरी नरेंद्र पवार यांनी पातोंडा येथील ग्रा.पं. सदस्य सागर मोरे यांना फोन केला असता त्यावर सागर मोरे यांनी संबंधित तक्रार अमळनेर येथील प्रांताधिकारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यावर प्रांताधिकारी यांनी डीफओ यांना सदर घटनेची माहिती देवून कार्यवाही करण्याचे सांगितले.
पण मोरे यांनी डी एफ ओ वनीकरण विभाग यांना फोन केला असता त्यांनी सदर बाब ही वनविभाग यांच्याकडे असल्याचे सांगितले तशी माहिती मी त्यांना देतो असे सांगितले. आणि बऱ्याच वेळानंतर अमळनेर येथील वनपाल यांचा फोन आला मात्र तोपर्यंत सदर वृक्षतोड करणारे इसम त्यांचे वाहन घेऊन पोबारा केला होता. मात्र अशी वृक्षतोड नेहमी होते त्यामुळे वनविभाग यांनी प्रत्येक गावातील ग्राम पंचायतीशी समन्वयक साधावा जेणेकरून नागरिकांना अशा तक्रारी कराव्या लागतील.मात्र याउलट वनविभाग उदासीन दिसते. मात्र असे बाहेरगावातील इसम येऊन बिनधास्तपणे वृक्षतोड करतात त्यांच्यामागे कुणाचा छुपा पाठिंबा असू शकतो ? .वनविभागच अशा घटनांना दुर्लक्ष करते की काय असा संभ्रम निर्माण होतो. नाहीतर सरकारने वर्षानुवर्ष कितीही कोट्यवधी झाडे लावली तरी त्याचा उपयोग होणार नाही.
मात्र आतातरी वनविभाग यांनी जागे होवून खबरदारी घ्यावी असे मत ग्रा.पं. सदस्य सागर मोरे यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा