Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
उत्कृष्ट कामगिरी बद्दल बसचालकाच्या मुलाचा सत्कार
शेगाव:प्रतिनिधी:या एस टी डेपो मध्ये कार्यरत चालक गजानन जाधव यांच्या मुलगा निखिल हा हॉटेल व इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण न्यूझीलंड येथे घेऊन परत आला.त्याबद्दल शेगाव एस टी आगार व्यवस्थापक सुभाष भिवटे यांचेसह कर्मचारी,चालक वाहक कामगार यांनी त्यांचा बुके देऊन गौरव केला.
शेगाव एस टी डेपो मध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले गजानन जाधव यांच्या मुलगा निखिल याने न्यूझीलंड येथे हॊटेल मॅनेजमेंटचे महागडे व्यवसायिक प्रशिक्षण काटकसर करत स्वखर्चाने पुर्ण केले.यामध्ये त्याला यश आल्यावर तो शेगाव येथे स्वगृही परत आला असता शेगाव एस टी डेपो मॅनेजर सुभाष भिवटे,यांचेसह आगार लेखाकार अशोक देशमुख, वाहतूक निरीक्षक ए.जी.मुसळे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक शेषराव देशमुख,एस टी कामगार संघटनेचे माजी विभागीय अध्यक्ष एस एम फासे,शेगाव डेपो कामगार संघटना अध्यक्ष महेश बुरुंगले, कामगार सेना अध्यक्ष सचिन सनगाळे, एस के दिवनाले, एस डी घावट, व्ही आर पाटील,एन डी बघे,एस पी पाचपोहे, पी एस आपोतीकर,पी जे बुंदे, एस एम माटे, पी डी जुमळे, एन बी गवई,विठ्ठल बहाळ, व इतर चालक वाहक कामगार कर्मचारी यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवुन गौरव केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा