Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
विद्यार्थिनीनि खंबीर तर व्हावेच पण सोबतच कायदेविषयक जाण ही असावी असे. "विद्यार्थिनी संवाद " या कार्यक्रमात ऍड अनिता भाबेरे-अहिरराव यांनी विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन
विद्यार्थिनीनि खंबीर तर व्हावेच पण सोबतच कायदेविषयक जाण ही असावी असे. "विद्यार्थिनी संवाद " या कार्यक्रमात ऍड अनिता भाबेरे-अहिरराव यांनी विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन
धुळे:प्रतिनिधी:दि 25-महाविद्यालयातील रॅगिंग विरोधी कमिटी व विशाखा समिती च्या वतीने आयोजित "विद्यार्थिनी संवाद " या कार्यक्रमात ऍड अनिता भाबेरे - अहिरराव प्रमुख वक्त्या. म्हणून बोलत होत्या यावेळी त्यानी विद्यार्थिनींना विविध कायदयांची ओळख करून दिली, महिलाच्या सुरक्षितते बाबतीत ही मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हे कसे घडतात व आपण कशी सावधानता बाळंगावी हे स्पष्ट केले
समाजात वावरताना महिला व मुलींनी सजग असलेच पाहिजे परिवारा सोबत तसेच आपल्या सहकाऱ्यांसोबत शैक्षणिक परिसरात अथवा आपण वावरतो त्या सर्व ठिकाणी आपला संवाद स्पष्ट व निकोप असावा काही अनर्थ घडणार आहे असे वाटत असेल तर या प्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेतल्यास हिंगणघाट सारखी घटना घडल्यापासून रोखता येऊ शकते स्वतःचा सिक्स सेन्स अधिक जागृत करत मानसिक दृष्ट्या सकारात्मक व खंबीर व्हावे सद्यस्थितीत सभोवताली घडणार्या घटना पाहता शालेय जीवनातच कायदेविषयक किमान तोंडओळख असल्यास चुकीच्या कृतींना नक्कीच आळा बसेल रिणामाची जाणीव असल्याने चुकून कदाचित होणाऱ्या गुन्ह्याचा बाबत आळा बसेल आजच्या काळात समाज माध्यमावर वावरणे अपरिहार्य झाले आहे परंतु कुठे थांबावे याचे तारतम्य असले पाहिजे ठामपणे 'नाही' म्हणणे शिकलेच पाहिजे यासाठी संस्कारा सोबत सुसंवाद ही असलाच पाहिजे कायदेविषयक जाण असल्यास "आरोपी अथवा गुन्हेगार " या उपाधी पासून दूर राहता येईल
महिलांन बाबत एखादी घटना घडल्या म्हणल्यावर चर्चा करण्यापेक्षा अशी घटना घडूच नये याबाबत उपाययोजना झाल्या पाहिजे कायदा तर कठोर आहेत परंतु त्याची अंमलबजावणीही इतक्याच कठोरपणे व्हावी याबाबत आग्रही असले पाहिजे असेही ऍड भाबेरे यानी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापिका भावना पाटील यांनी मांडले व मोठ्या संख्येने विद्यार्थीनिची उपस्थिती होती. या वेळेस सुरेखा पाटील, विभाग प्रमुख कम्प्युटर सायन्स प्रोफेसर. भावना पाटील ,प्रा मनीषा देवरे, प्रा जयश्री कांडेकर, हनीफ अंसारी , प्रा नेहा राजपूत, प्रा रत्ना पाटील मॅडम उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा