Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
चोपड्यात राज्यस्तरीय खुली नाट्य गीत गायन स्पर्धा संपन्न पुण्याचा सागर देशमुख प्रथम
चोपड्यात राज्यस्तरीय खुली नाट्य गीत गायन स्पर्धा संपन्न पुण्याचा सागर देशमुख प्रथम
चोपडा (प्रतिनिधी )प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चोपड्यात संत गजानन बहुद्देशीय संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा चोपडा नगरपालिकेच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पुण्याचा सागर देशमुख याने प्रथम क्रमांक पटकाविला.नाट्यगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शैला मयुर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा.वा.ना.आंधळे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विकास हरताळकर,जळगाव येथील आर.बी. गुजराथी,भाजप नेते घनश्याम अग्रवाल,चोपडा पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,पुणे येथील ख्यातनाम गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर,औरंगाबाद येथील प्रख्यात गायक विश्वनाथ दाशरथे,अध्यक्ष मनोज चित्रकथी तर बक्षीस वितरण कार्यक्रमास विवेकानंद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल,चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर,कवी अशोक सोनवणे,डॉ.लोकेन्द्र महाजन यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात आले.
या स्पर्धेत राज्यभरातील दहा गायकांनी सहभाग नोंदवला होता. त्यात जळगावच्या श्रुती वैद्य,संजय कुलकर्णी व मयुरी हरीमकर,चोपड्यातील अश्विनी डबू, पारोळा येथील रोहित अंभोरे व जयेश पाटील,मालेगावच्या राधिका पाटील नगरदेवळा येथील अमोल जाधव, पुणे येथील सागर देशमुख तर भडगावच्या प्रशांत सोळंके यांनी सहभाग घेत उत्तम नाट्यगीते सादर केली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सागर देशमुख याला पंधरा हजार रुपये रोख,स्मृतिचिन्ह,प्रशस्तिपत्र तर द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या मयुरी हरिमकर यांना अकरा हजार रुपये
रोख,प्रशस्तीपत्र,स्मृतिचिन्ह तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या प्रशांत सोळंके यांना सात हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तर उत्तेजनार्थ पाच हजार रुपयाचे बक्षीस,स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र श्रुती वैद्य यांनी पटकाविले.योगेश चौधरी यांनी सूत्रसंचालन तर सचिव विजय पालीवाल यांनी आभार मानले.
परीक्षक म्हणून विदुषी मंजिरी आलेगावकर,विश्वनाथ दाशरथे यांनी काम पाहिले संस्थेचे उपाध्यक्ष विजय जैस्वाल,सचिव विजय पालीवाल,डॉ.मनोज साळुंखे,एम.एन.शिंदे,मुकेश चौधरी,विजय दीक्षित,नरेंद्र भावे,कवी विलास पाटील,योगेश चौधरी,बी.यू. जाधव,राकेश विसपुते,एस.के. पाटील,विवेक बाविस्कर,जगदीश पाठक,विनोद धनगर,आर.व्ही. चौधरी,निलेश निकम,गोपाल निकम,निलेश कासार,दिनेश बाविस्कर,ए.पी.पाटील,पवन लाठी, सागर माळी,भरत राजपुरोहित,शुभम जोहरी,ज्ञानेश्वर चित्रकथी,भैरवी चित्रकथी,योगेश वारुळे,डॉ.एस.एल. चौधरी,अतुल चव्हाण,मयुर सोनवणे, भूषण देशमुख,कैलास भावसार, प्रदिप कोळी व संचालक मंडळाने कार्यक्रमास सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा