Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
भाजपाची दि. १४ रोजी धुळ्यात जिल्हा बैठक
शिरपुर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाची बैठक दि.१४ फेब्रुवारी २०२० शुक्रवार रोजी सकाळी ११:०० वाजेला एस. व्ही. के. एम. (माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांची) संस्था गुरुव्दारा मागे, मुंबई- आग्रा रोड धुळे या ठिकाणी होणार आहे. या जिल्हा बैठकीत भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामिण जिल्हाध्यक्ष निवड होणार आहे.
जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सुनिल बच्छाव हे उपस्थित राहाणार आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, राज्याचे माजी रोहयो मंत्री आ. जयकुमार रावल, राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, खा. डाॅ. हिनाताई गावीत, आ. काशीराम पावरा, भाजपा उत्तर महा. विभागीय संघटनमंत्री अॅड. किशोरजी काळकर, प्रदेश चिटणीस तथा जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, जि. प. उपाध्यक्षा सौ. कुसुमताई निकम आदी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीस जिल्हातील प्रदेश सदस्य, विविध आघाडी, मोर्चा प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद सभापती, जि. प. सदस्य, पं. स. सभापती, उपसभापती, पं. स. सदस्य, नगराध्यक्षा, नगरसेवक, बुथ अध्यक्ष, सक्रीय सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहान जिल्हा संघटन सरचिटणीस तथा जिल्हा निवडणुक सहाय्यक अधिकारी किशोर सिंघवी, जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, कामराज निकम, अरुण धोबी यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा