Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल.




प्रतिनिधी:नोव्हेंबर २०१९ पासुनचे थकीत मानधन लवकरच मिळणार...


थकीत मानधन व वाढीव मानधनाच्या नीधीस मंजुरी बाबत शासनाचा जि.आर. 



राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नोव्हेंबर 2019 पासुनचे थकीत मानधन आणि ऑक्टोबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीतील मानधनवाढीची थकीत रक्कम विनाविलंब अदा करण्यात यावी.या मागणीसाठी संघटनेमार्फत सातत्याने मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केला जात होता.


सदर पाठपुराव्यामुळे थकीत मानधन आणि मानधनावाढीच्या थकीत रकमेसाठी लागणाऱ्या निधीची फाईल दि. 07 जानेवारी 2020 रोजी आपल्या विभागाने वित्त विभागाकडे सादर केली होती. 

सदर निधीची फाईल मंजुर होऊन वित्त विभागाकडुन काल दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी निधी आपल्या विभागाला प्राप्त झालेला आहे असे शासन निर्णयात नमुद केले आहे. त्यानुसार आज दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी सदर जिआर. काढण्यात आला आहे.
        
संघटनेच्यावतीने सततच्या प्रयत्नांनानाअखेर यश आले

 नेतृत्व

मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते....

टिप - सोबत जि. आर. ची प्रत पाठवत आहोत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध