Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

शिरपूर तालुक्यात अवैध धंदे चालत आहेत जोमात ,आदिवासी समाजाचे निवेदन




शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर शहरासंह तालुक्यातील आदिवासी समाजाला भेडसवणारी व मोठ्या प्रमाणावर घडणारे अनुचित व गैर प्रकाराची गंभीरतेने दखल घेऊन योग्य ती दंडात्मक कारवाई होणे बाबत चे निवेदन आज अखिल महाराष्ट्र आदिवासी जन जागृती संघटना व प.स.शिरपूचे सभापती, जि.प.सदस्य,प.स.सदस्य,सरपंच,सामाजिक कार्यकर्ते,कर्मचारी ,आदिवासी बांधव यांचा उपस्थितीत 

मा.प्रांत अधिकारी,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी व मा.काशिराम पावरा,आमदार-शिरपूर विधान सभा आदिंना निवेदन देण्यात आले.

सविस्तर वुत्त असे की,गेल्या कित्येक वर्षापासून शिरपूर शहरासह तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे जसे की,"स्पिरीट" नामक रसायनांपासुन बनावट मद्य तयार करुन ती आदिवासी पाड्यांवर विकणे ,जुगार अड्डे इ हि मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे.

तसेच काही महिंन्यापासुन आमच्या आदिवासी समाजातील तरुणींना पैशाचे व इतर आमिष दाखवून किंवा तीच्य परिवाराला काहितरी आमिष दाखवुन इतर गैर आदिवासी समाजात लग्न लावुन देण्याचा प्रकार आढळत आहे व अशा प्रकारे लग्न लावून देणाऱ्या एजंटची रँकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आशा गंभीर व संवेदनशील प्रकार समाजात घडत असतांना प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येते.तसेच शिरपूर शहरात शेतमाल,भाजीपाला विक्रीसाठी येणारे आदिवासी शेतकरी बांधवाना त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत लुटमार केली जाते.त्यांना दुकान लावू न देणे,जातीवाचक शिवीगाळ करणे,त्यांना पळवून लावणे यासारखे अनुचित प्रकार सर्रासपणे घडतांना दिसत आहे.आदिवासी ग्रामीण क्षेत्रातून खेड्या,पाड्यांवर मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुल व मुली यांची एजंट मार्फत शाहू भागात शेत मजूरीसाठी मोठ्या प्रमाणात गाड्या भरुन अवैद्यपणे नेले जाते.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिवाय त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा  गंभीर प्रकार घडत आहे.

वरील सर्व प्रकरणे हे अतिशय गंभीर व संवेदनशील स्वरुपाचे असून प्रशासनाने जातीने याकडे लक्ष घालून गंभीरतेने दखल घेऊन योग्य ती कारवाई व्हावी असे निवेदन आदिवासी समाजाकडून देण्यात आले ..
निवेदन देते वेळी आखिल महाराष्ट्र आदिवासी जन जागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश पावरा,जिल्हा अध्यक्ष यशवंत पावरा,ता.अध्यक्ष आकाश पावरा,के.एस.पावरा (निवुत्त बँक अधिकारी),प.स.सभापती सत्तारसिंग पावरा,सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाडवी,रमण पावरा,प.स.सदस्य बालकिसन पावरा,कैलास पावरा,जगदिश पावरा,प.स.सदस्य मानसिंग पावरा,सरपंच भोग्या पावरा,प.स.सदस्य विजय खैरनार,माजी सरपंच नारसिंग पावरा,सरपंच विजय पारधी ,राहुल पावरा व मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध