Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हॉटेल व्यवसाया सोबत बिअर बार उघडा अशा वक्तव्याचा जाहिर निषेध करण्यात आला






धुळे:प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी व बेरोजगार तरूणांसमोर स्वयंरोजगाराचा सल्ला देतांना सांगितले की शाकहारी हॉटेल सुरु केले की ते चालत नाहीत. शाकाहारी हॉटेलला मांसाहाराची जोड दिली पाहीजे आणि तेही हॉटेल जोरात चालण्यासाठी दारुचे परमीट रुम सुरु केले पाहीजे असे वक्तव्य त्यांनी जळगांव येथे केले. 

मुख्य म्हणजे  हे वक्तव्य त्यांनी विद्यार्थ्यांसमोर केले आहे हे अत्यंत अशोभनीय आहे. आज सर्वत्र महिला व सुज्ञ नागरीक अत्यंत कळकळीने कायम स्वरुपी दारुबंदी व्हावी यासाठी मागणी करीत आहेत. या व्यसनामुळे रोज
अपघात, भांडण तंटे, मारामान्या, महिलांचा छळ, बलात्कार, तरुणांचा मृत्यु असे शेकडो घटणा घडत आहेत. अश्या व्यसनाचे जाहिररीत्या समर्थन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील करीत आहेत. त्याचा आम्ही तमाम सुज्ञ नागरीकांच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करीत आहोत.

त्याचप्रमाणे मागील महिन्यात चंद्रपुर जि्ल्ह्याचे पालक मंत्री मा. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्याचाही आम्ही निषेध नोदवित आहोत. याप्रकारे ह्या सरकारचे मंत्री लोकोपयोगी कामे करण्याऐवजी तरुणंना दारु पाजुन झिंगत ठेवण्याचे काम करीत आहे. याचा आम्ही जाहिर निषेध करतो आणि रोजगारासाठी इतरही चांगले कामे करता येऊ शकतात याचा विकल्प खरे म्हणता तरुण पिढी आणि बेरोजगारांना देणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे मंत्र्यांच्या वक्तव्याने समाजात दारु आणि व्यसनाला राजमान्यता मिळते आणि आमच्या सारखे 'चला' व्यसनाला बदनाम करु या अशा प्रकारे मोहिेमा राबविणार्या संघटनंचे कामास अत्यंत मर्यादा येतात आणि राज्याला दारुच्या महासागरात लोटण्याचे काम अशा लोक्प्रतिनिधींकडून होत असतील तर कुंपणच शेत खाते, तक्रार कुणाकडे करावी अशा प्रकारे संभ्रम निर्माण होतो. कल्याणकारी राज्याच्या प्रशासनाने जनहिताचे निर्णय घेतांना व्यसनांना आळा घालण्याचे काम  करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया जवळ निदर्शने करण्यात आली यावेळी. चंद्रविर सावळे, अंन्दुल अन्सारी, विलास करखक, नवल बी. ठाकरे, अॅड, विनोद बोरसे, रामदास जगताप आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध