Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

मराठा गल्ली शिरपूर येथे श्री गंगेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने आज दि. २१ रोजी किर्तन सोहळ्याचे आयोजन




शिरपूर:प्रतिनिधी:येथील मराठा गल्ली येथे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्री गंगेश्वर महादेव, श्री हनुमान मंदिर  जिर्णोधार समिती व जे.बी.ग्रुप मराठा गल्ली शिरपूर यांच्याद्वारे महाशिवरात्री निमित्ताने खान्देशातील प्रसिद्ध कीर्तनकार  ह.भ.प. श्री. नाना महाराज नरडाणेकर यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


यास प्रमुख मृदुगाचार्य गणेश महाराज साकवदकर, गायनाचार्य राजेंद्र महाराज कापडणेकर तसेच समस्त ह.भ.प. श्री संत सावता महाराज भजनी मंडळ, वरचे गांव व वरवाडे शिरपूर यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन मिती माघ कृष्ण पक्ष दि.२१ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ८.३० वाजता संपन्न होत आहे.

या जाहीर कीर्तन सोहळ्याचे प्रमुख मानकरी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल राहणार असून कीर्तनास प्रमुख मान्यवर आमदार काशीराम पावरा, नगरसेवक तपनभाई पटेल, दिलीप लोहार, चेअरमन, डॉ.विक्रम बांदल (प्रांताधिकारी), तहसीलदार आबा महाजन, हेमंत पाटील (पोलीस निरीक्षक), अमोल बागुल (मुख्याधिकारी), प्रभाकरराव चव्हाण, प्रसन्न जैन, श्यामकांत ईशी, राजेंद्र अग्रवाल, अशोक कलाल, शरद अग्रवाल, माधवराव पाटील, महादू पाटील, किरण दलाल, शिरपूर शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री. गंगेश्वर महादेव मंदिर मराठा गल्ली येथे सकाळी विधीवत अभिषेकाचे आयोजन वेदशास्त्री अजय महाराज धर्माधिकारी यांच्या द्वारे करण्यात आले असून प्रसादाचे वाटप सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यत करण्यात येणार आहे.

तरी अभिषेक व कीर्तन  सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.हनुमान मंदिर जिर्णोधार समिती, जे.बी.ग्रुप व समस्त नागरिक मराठा गल्ली शिरपूर तसेच ह.भ.प.श्री संत सावता माळी भजनी मंडळ वरचे गांव शिरपूर यांच्या द्वारे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध