Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

बारा वर्षापूर्वी खूनाच्या गुन्ह्यांमध्ये फरार आरोपीस थाळनेर पोलसांकडून अटक




थाळनेर:प्रतिनिधी:थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतील मागील सुमारे बारा वर्षापूर्वी खूनाच्या गुन्ह्यांमध्ये पैठण कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर सुटलेल्या कैदी संतोष कोळी राहणार असली तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा आरोपी मागील अकरा वर्षांपासून फरार होता.

त्यास शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न करून देखील  तो सापडत नव्हता. परंतु थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना त्याच्या वास्तव्या बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी तात्काळ थाळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांना त्याचा ठावठिकाणा बाबत माहिती दिल्यानंतर थाळनेर पोलिस स्टेशनचे पीएसआय रसाळ यांनी पोलीस कॉन्स्टेबल सिराज खाटीक पोलीस कॉन्स्टेबल उमेश आळंद पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पावरा तसेच वाहन चालक पोलीस नाईक पंडित मोरे अशांना सोबत घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास असली गावातून संतोष कोळी यास ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकरमेश पारधी व पोलीस कॉन्स्टेबल उमेश आळंदे यांनी पैठण खुले कारागृह येथे दाखल केले. अतिशय महत्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक विश्र्वास पांढरे साहेब, शिरपूर डीवाय‌एसपी माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलिस पथकांनी केलेली आहे.

याबद्दल धुळे जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व  व ग्रामस्थांनी  देखील थाळनेर  पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध