Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी भा ज पा महिला आघाडीच्या वतीने निवेदन





धुळे:प्रतीनिधी:वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी मार्गावर प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळणाऱ्या तरुणाला त्वरित फासावर लटकावे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही आशा रोज घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा वृत्तींना वेळीच ठेचणे आवश्यक झाले

असून अशी प्रकरण आहेत फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून ताबडतोब निकालात काढली पाहिजे अलीकडे महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून आपली प्रदीर्घ काळ चालणारी न्यायव्यवस्थाही याला कारणीभूत ठरत चालली आहे की काय असाच प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे निर्भया आत्याचार प्रकरणात आरोपींच्या फासावर लटकविण्याच्या आदेशावर वारंवार आणली जाणारी स्थगिती अशा घातक प्रवृत्तींना अप्रत्यक्ष बळच देते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे 

वर्धा जिल्ह्यातील या घटनेचा आम्ही त्तीव निषेध करत आहोत तरी या घटनेवर त्वरित कारवाही करून दोषी आरोपीस कठोर अशी फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे महिला व युवती आघाडीतर्फे करीत आहोत असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरठा अधिकारी रमेश मिसाळ यांना देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष, जयश्रीताई अहिरराव, निशा पाटील, रत्‍नाबाई बडगुजर, अमृता पाटील, मायादेवी परदेशी, मंजुषा लोहालेकर, अल्पा अग्रवाल, आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध