Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
समाज समस्यांची सोडवणुक करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर... कोपरगांव टीम
कोपरगाव:प्रतिनिधी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात अनेक शिवभक्तांनी, शिवप्रेमी नागरिकांनी शिवजयंती निमित्त अनेक सामाजिक कार्य केले आणि कार्य करण्यासाठी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शपथ घेतली यातील एक उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील साई निवासस्थान,गोदावरी नदीच्या पावन काठावर वसलेले शहर अर्थात कोपरगांव येथील समाजसेवक बांधव ज्यात श्री योगेशजी मोरे भोईसमाज युवा क्रांतीदल उपाध्यक्ष, श्री अर्जुन मोरे युवा राज्यप्रसिद्धी प्रमुख, श्री विजयमोरे भोईसमाज युवा क्रांतीदल महाराष्ट्र प्रदेश अहमदनगर जिल्हाअध्यक्ष, अनिल हारणे शहर अध्यक्ष भोईसमाज युवा क्रांतीदल, ईश्वर साटोटे शहर प्रसिद्धीप्रमुख, मनोज मोरे समाजसेवक यांनी कोपरगांव आणि परिसरात समाज बांधवांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे आमच्या प्रतिनिधीस कळविले. समाजपातळीवर अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यात येत असल्याच्या बाबींची तरुण गर्जना परिवार हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आणि पुढील काळातील कार्यास हार्दिक शुभेच्छा प्रदान ही करत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा