Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर - जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी धुळे शहर. विजय नरेश पवार
महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर - जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी धुळे शहर. विजय नरेश पवार
धुळे:प्रतिनिधी:दि.२४/२/२०२० रोजी धुळे शहरातील मौजे धुळे स.नं.५३२/१/अ रामदेव बाबा नगरमधील
वाल्मिकी मेहतर समाजाचे मनपा सफाई कामगारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत निवासस्थाने बांधण्यासाठी जागेची मोजणी करत असताना नगर भुमापन करताना महानगरपालिका नगररचना अधिकारी संजय बहाळकर व श्री.कमलेश कर्मचारी,धुळे यांच्यामार्फत मोजमाप करण्यात आले.
तरी या कामासाठी विशेष मार्गदर्शन खा.सुभाषजी भामरे तसेच मुख्य मार्गदर्शक व खंबीर नेतृत्व अनुपजी अग्रवाल जिल्हाध्यक्ष भाजपा धुळे,यांच्या अथक प्रयत्नातून, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे, उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांचे मार्गदर्शन लाभले व आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गिरीश गिरी धुळे महानगरपालिका, कैलास शिंदे, धुळे मनपा बांधकाम अभियंता, नगररचना परदेशी साहेब यांचे सहकार्य लाभले.
तरी यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, किशोर जाधव सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष सुरज अहिरराव, तसेच नगरपालिका कामगार प्रतिनिधी काशिनाथ लोहरे, प्रकाश घारू, राजू मेघराज घारू, मेघराज घारू, संजय लोहरे, जगदिश लोहरे व महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिरालाल डिंगोरे व बहुसंख्य कामगार उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा