Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
मातृसंस्थेकडून नवनिर्वाचीत पदाधिकाNयांचा सन्मान..
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघ परिषदेशी संलग्न
बुलडाणा:प्रतिनिधी:८४ वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेली मराठी पत्रकार परिषद राज्यातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असून, या परिषदेशी आता तालुका पत्रकार संघ थेट संलग्नीत होत असून बुलडाणा जिल्ह्यातील १३ही तालुका पत्रकार संघ हे परिषदेशी संलग्नीत आहेत. ही बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे गौरवोदगार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी काढून, बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक लोकशाही पध्दतीने पारदर्शकपणे झाल्याबद्दल त्यांनी परिषदेच्यावतीने सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाNयांचा अक्कलकोट मेळाव्यात सन्मान केला.
मराठी पत्रकार परिषदेचा अक्कलकोट जि.सोलापूर येथे शनिवार ८ पेâब्रुवारी रोजी जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार व पदाधिकाNयांचा मेळावा पार पडला, त्यावेळी अक्कलकोट तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचा सत्कार करण्यात आला.
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक ही लोकशाही पध्दतीने घेवून पारदर्शीपणे कार्यकारीणी निवडल्याबद्दल राजेंद्र काळे यांचा हा सत्कार होता. त्यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सरचिटणीस नितीन शिरसाट, उपाध्यक्ष विश्वास पाटील व युवराज वाघ तथा जिल्हा कार्यकारीणी सदस्य अनिल उंबरकार या पदाधिकारी मंडळींचा सत्कार अक्कलकोट येथे परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख व किरण नाईक, न्यूज १८ चे संपादक महेश म्हात्रे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी व अन्य पदाधिकाNयांच्याहस्ते यावेळी संपन्न झाला.
मराठी पत्रकार परिषदेच्या याच अक्कलकोट येथील मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका पत्रकार संघ हा अमरावती विभागातून स्व.वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित झाला. ही बाब बुलडाणा जिल्ह्यासाठीही गौरवास्पद असल्याचे या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा