
शिवाजी पारधी अमळनेर : दहिवद येथील रेशन दुकानदार रमेश काशिनाथ पाटील
यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश १
फेब्रुवारी रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अमळनेर तहसिलदार यांना दिले होते.आदेशात
विनाविलंब कारवाई करावी असा अभिप्राय जिल्हा विधी अधिकारी यांनी दिला होता. जिल्हा
पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास तहसिलदार अमळनेर यांनी तब्बल ६
दिवस विलंब करत ६ फेब्रुवारी रोजी पुरवठा निरीक्षक राजेंद्र साळुंखे यांना गुन्हा दाखल करण्यासाठी
आदेशित केले .पुरवठा निरीक्षक यांनी अमळनेर तहसिलदार यांच्या आदेशाचे गांभीर्य
लक्षात न घेता शासकीय कामांत हलगर्जीपणा व टाळाटाळ करत दोन दिवसानंतर ८ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन गाठले.
त्याठिकाणी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करून घेतला
नाही म्हणून पुरवठा निरीक्षक साळुंखे यांनी तहसिलदार यांना १२ फेब्रुवारी रोजी
पत्रव्यवहार करून सांगितले .
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या १ फेब्रुवारी रोजी
दिलेल्या आदेशाची अमलबजावणी तब्बल १७ दिवस उलटून देखील अमळनेर तहसीलदार यांनी विंनाविलंब
केलेली नाही.जिवनावश्यक वस्तुत अपहार व गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानदाराला अभय
देण्यासाठी चालू असलेला शासकीय कामातील अमळनेर तहसिलदार यांचा हलगर्जीपणा
तक्रारदार पंकज पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या लक्षात आणून दिला असून
शासकीय कामांत हलगर्जीपणा व हयगय करणाऱ्या अमळनेर तहसिलदार मिलिंद वाघ यांच्यावर
शिस्तभंग विषयक कारवाई विनाविलंब करण्याची मागणी जिल्हापुरवठा अधिकारी यांच्याकडे पंकज पाटील यांनी
केली आहे.त्याच्या प्रति त्यांनी माहितीस्तव जिल्हाधिकारी ,आयुक्त ,मंत्री अन्न
नागरी पुरवठा ,राज्यमंत्री बच्चू कडू व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे याना दिलेल्या आहेत.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जिल्हा
पुरवठा अधिकारी यांना त्वरित व तात्काळ उचित कारवाई करण्यास सांगितले असून त्याबाबतची माहिती
तक्रारदार यांना देण्यात आली आहे.
रेशन गैरकारभार करून गरिबांचे हक्काचे रेशन धान्य खाणाऱ्या रेशन
दुकानदाराला वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राजकीय लोकांची नावे सुद्धा पुढे आलेली
असून या राजकीय षडयंत्रात सामील असणाऱ्या भ्रष्ट पुढाऱ्यांचा चेहरा देखील पंकज
पाटील जनतेसमोर आणणार असल्याचे त्यानी
सांगितले. गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यापासून रोखणारा
खरा खलनायक कोण ? या भ्रष्टाचारात सामील
असलेला नेता व अधिकारी कोण ? प्रशासनाचा खरा चेहरा यानिमित्ताने जनतेसमोर
आला असून संपूर्ण अमळनेर तालुक्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागुन आहे.अमळनेर तालुक्याच्या
इतिहासात एका सर्वसाधारण माणसाने अमळनेर तहसिलदार यांच्यावर शिस्तभंग विषयक
कार्यवाहीची मागणी केलेली असल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दणाणले
आहे.
अमळनेर तहसिलदार रेशन दुकानदार यांच्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार विनाविलंब गुन्हा दाखल करतात का ? राजकीय दबावाला बळी पडतात ! हे यावरून दिसून येणार आहे.
जिल्हा अधिकारी यांनी उचित कार्यवाही ची अपेक्षा करतो
उत्तर द्याहटवा