Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
आ.डॉ.संजय कुटे व नगराध्यक्षा सौ.बूच यांच्या हस्ते आज शेगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ तर डॉ.बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाले
आ.डॉ.संजय कुटे व नगराध्यक्षा सौ.बूच यांच्या हस्ते आज शेगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ तर डॉ.बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाले
शेगाव:प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा १०वाजता १९ फेब्रुवारी रोजी शिवरायांचा अश्वरूढ पुतळा नियोजित जागी स्थानापन्न करून लोकार्पण केले गेले.
नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बुच यावेळी माजी कॅबिनेट मंत्री तथा आ.डॉ.संजय कुटे यांच्यासह नगर पालिकेचे उपाध्यक्ष, सर्व सभापती व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील हिंदु व बौध्द समाजबाधवांच्या मागणीवरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा निर्मीतीचे वचन माजी कॅबिनेट मंत्री आ.डॉ.संजय कुटे व नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बुच यांनी संबधीतांना दिले होते. दोन्ही समाजबांधवांच्या मागणीनुसार न.प.सभागृहात सर्वानुमते ठराव मंजूर करून तत्कालीन मुख्याधिकारी व माजी नगराध्यक्ष तथा भाजप गटनेते शरदसेठ अग्रवाल यांच्यासह सत्ताधारी यांनी याकरीता सततचा पाठपुरावा करून न.प.प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करून घेतली व प्रत्येकी 21 लक्ष रूपये किंमतीच्या दोन्ही पुतळ्यांच्या निर्मितीसाठी पुणे येथे ऑर्डर दिली होती.त्यावरून पुणे येथील कला संस्कार आर्ट स्टुडीओ येथे या भव्य अशा दोन्ही पुतळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या पर्वावर आज १९फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या नियोजित जागी स्थानापन्न करून लोकार्पण केल्या गेले.
यावेळेस शेगावात आनंद निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे संतनगरीत या दोघा महापुरूषांचे भव्य पुतळे बसविल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून हे पुतळे तरूणाईकरीता प्रेरणादायी ठरतील. यावेळी नगर पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती. तरी यावेळी ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शेगाव वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा