Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
जाणता राजाच्या सेटवर छञचामर धरण्याची संधी मिळाली...धन्य ते राजे,धन्य ते स्वराज्य...श्री अर्जुनभोई,मुंबई
जाणता राजाच्या सेटवर छञचामर धरण्याची संधी मिळाली...धन्य ते राजे,धन्य ते स्वराज्य...श्री अर्जुनभोई,मुंबई
खरच... आम्ही धन्य झालो आहोत आज ज्या महान राजाच्या डोक्यावर छञचामर धरण्याची संधी आम्हाला जाणता राजाच्या सेटवर मिळाली...आज इतिहासाच्या पानांना पलटतांना आम्ही लेखन करतो की, आमच्या भुतकाळातील मागील ब-याच पिढ्या ह्या राजाच्या दरबारी राजाच्या पालख्या उचलण्याचे कार्य करीत होत्या. ते कार्य करत असतांना राजाला किंबहुना स्वराज्याला आम्ही कधीही दगाफटका करण्याची आमची मनिषा नव्हती किंबहुना ती आमच्यात निर्माण झाली नाही आणि आम्ही बाराबलुतेदार व अठराअलुतेदार घटक म्हणून अभिमानाने भोई तत्समजमाती ठिक ठिकाणी कार्यरत होतो अर्थात एक बहुजनसमाज म्हणून राजाची, स्वराज्याची सेवा करत होतो.
राजाच्या पालख्या, महाराणी यांच्या पालख्या उचलण्यातच धन्यता मानत होतो ; परंतु त्या पालख्यांमध्ये बसण्याचा कधी ही आम्ही अट्टाहास केला नाही. ईमानदारीने आम्ही आमचे पालख्या उचलण्याचे कार्य राजाच्या काळात करत होतो आणि तिच धन्यता छञपतींच्या प्रति होती; परंतु आजची वेळ ही वेगळी परिस्थितीची आहे. तरुणांनो, आजच्या वर्तमान काळातील सत्तेच्या पालखीत आम्ही भोयांनी बसावे का? की दुस-याच्या पालख्या वाहण्यात आम्ही धन्यता मानावी? हाच प्रश्न आज पुन्हा समोर उपस्थित होतांना दिसतो आहे आणि त्याची सोडवणूक आमच्या भटक्या जमातीतील अर्थात भोई तत्सम जमातीतील तरुणांनी करावयाची आहे.
आम्ही आजही म्हणतो धन्य ते छञपती राजे आणि धन्य ते स्वराज्य कारण त्यांनी आमच्या वर फार मोठा विश्वास दाखवला होता, आम्ही राजाच्या खुप जवळ होतो आमच्या मजबुत खांद्यावर त्याचा विश्वास होता आणि तो विश्वास भोयांनी सार्थ केला; परंतु तरुणांनो, आता तरी राज्यातील आमच्या हक्काचे काय? तुमच्याकडून या विषयावर उत्तराची मी अपेक्षा व्यक्त करतो... जय शिवराय, जय भोई तत्सम राज...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...
सुरेख,जय भवानी ! जय शिवाजी !
उत्तर द्याहटवा