Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

सानेगुरुजी शाळेतील कॅम्पमध्ये डॉक्टरही बाळगताहेत संपूर्ण सुरक्षा-डॉ नितीन पाटील रुग्णांची उसळली गर्दी तिसऱ्या दिवशी 288 रुग्णांची तपासणी


प्रतिनिधी अमळनेर-येथील सानेगुरुजी शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांच्या आवाहनानुसार सुरू करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये पालिका व सर्व डॉक्टर्स जोखीम घेऊन केवळ एक कर्तव्य म्हणून सेवा देत असून याठिकाणी डॉक्टर देखील संपुर्ण सुरक्षितता बाळगत असल्याची माहिती आय एम ए चे अध्यक्ष डॉ नितीन पाटील यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ नितीन पाटील यांनी सांगितले की अमळनेर आय एम ए चे डॉक्टर्स सदस्य आणि पालिकेचे डॉक्टर याठिकाणी सेवा देत असून कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने त्यापासून बचावासाठी सर्व डॉक्टर्स मास्क
गाऊन,कॅप,ग्लोव्हज,सॅनिटायझर,आदींचा वापर नियमानुसार करीत आहेत.

प्रामुख्याने सर्दी,ताप व खोकल्याचे रुग्ण याठिकाणी तपासले जात आहेत, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 1 यावेळेस कॅम्प सुरू राहत असून रविवारी कॅम्प बंद ठेवला जात असतो,या कॅम्प मध्ये येणाऱया रुग्णांची नोंद करून पत्ताही घेतला जात असून बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीस क्वांरटाईन चा शिक्का मारून दिला जात आहे., रुग्ण तपासताना सोशल डिस्टनसिंग ठेवण्यासाठी 2 मीटर अंतरावर त्यास बसविले जात असते,व आवश्यकता भासल्यास शासकीय रुग्णालयात पाठविले जाऊ शकते.

जनतेने कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्दी व तापाची लक्षणे दिसल्यास सदर केंद्रात तपासणी करून घ्यावी जेणेकरून आपले गाव आपण सुरक्षित ठेऊ तसेच आम्ही सर्व डॉक्टर्स केवळ एक कर्तव्य समजून ही सेवा देत आहोत,ही जोखीम असली तरी सेवेचा आनंद आम्हाला आहे, आमदार अनिल पाटील देखील याठिकाणी आम्हाला प्रोत्साहन म्हणून बराच वेळ देत आहेत,सोबत पालिका व महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व इतर पदाधिकारी देखील मदतीला आहेत,आता जनतेने देखील आपली जवाबदारी ओळखून स्वतःला घरात बंदीस्त केल्यास निश्चितच आपण अमळनेरकर सर्व मिळून कोरोनाला माघारी पाठवू असा विश्वास डॉ नितीन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी कॅम्पचा तिसरा दिवस होता यादिवशी तब्बल 204 नागरिक व 84 मुले तपासणीसाठी आले होते. असे एकूण 288 जणांनी तपासणी केली तर आतापर्यंत 3 दिवसात 513 रुग्णांची तपासणी मोफत झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध