Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

अमळनेर तालुक्यातील डेव्हलपमेंट ऍग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीला आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत घरपोच शेती संबंधात वस्तू व भाजीपाला पोहचविण्याची परवानगी देण्यात आली



अमळनेर प्रतिनिध तालुक्यातील डेव्हलपमेंट ऍग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीला आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत घरपोच शेती संबंधात वस्तू व भाजीपाला पोहचविण्याची परवानगी देण्यात आली असून आमदार अनिल पाटील यांनी स्वतः 

भाजीपाला मोजून  आमदार स्मिता वाघ यांनी तो खरेदी करून त्यांच्या हस्ते या विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले 

      
कोरोनामुळे वाहतूक बंदी , लॉक डाऊन मुळे नागरिक काही नागरिक घराबाहेर पडण्यास भीत असून अशावेळी शेतकऱ्यांना बी बियाणे ,खते , कीटक नाशके ,भाजीपाला ,फूड पॅकेट्स पुरवणे आवश्यक असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी येथील कंपनीला 14 एप्रिल पर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यास परवानगी दिली आहे 

विक्री केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बाजार समिती सभापती प्रफुल पाटील ,प्रांताधिकारी सीमा आहिरे ,तालुका कृषी अधिकारी भारत वारे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी,आत्माचे समन्वयक भूषण पाटील , भाजपा तालुकाध्यक्ष व उत्पादक कंपनी संचालक हिरालाल पाटील यांच्यासह  तुषार पाटील ,रमेशगिर गोसावी , रामदास पाटील ,भटू पाटील,नथ्थू पाटील , मधुकर पाटील , गोकुळ पाटील , प्रकाश पाटील , शशिकांत पाटील , किरण अहिरे आदी उत्पादक कंपनी संचालक व कर्मचारी हजर होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध