Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर बुधवारी सायंकाळी सुमारे 3 ते 4 दिवसांपूर्वी मयत झालेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह विश्राम जिंसी गावचे शिवारात भगवान महाजन यांचे शेताचे नाल्यामध्ये कुजलेले अवस्थेत मिळून आले
रावेर बुधवारी सायंकाळी सुमारे 3 ते 4 दिवसांपूर्वी मयत झालेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह विश्राम जिंसी गावचे शिवारात भगवान महाजन यांचे शेताचे नाल्यामध्ये कुजलेले अवस्थेत मिळून आले
रावेर:प्रतिनिधी:बुधवारी सायंकाळी सुमारे 3 ते 4 दिवसांपूर्वी मयत झालेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह विश्राम जिंसी गावचे शिवारात भगवान महाजन यांचे शेताचे नाल्यामध्ये कुजलेले अवस्थेत मिळून आले.
याबाबत रावेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,
मयत अनोळखी पुरुष वय सुमारे 37 ते 40 वर्ष, बांधा-मध्यम, रंग-सावळा, उंची- 165 सेंटी मीटर, केस-काळे व 2 ते 3 इंच लांबीचे, अंगात काथ्या कलरचा फुलबाईचा शर्ट त्यावर पांढऱ्या रंगाच्या लायनिंग
ग्रे रंगाची फ़ुलपॅन्ट, निळे रंगाची अंबर कंपनीची निकर, डावे दंडावर उडते हनुमानजीचे गोंदलेले छायाचित्र व लालसिंग असे नाव गोंदलेले,एक टायगर कंपनीचा डावे पायाचा बूट 8 नंबरचा पिवळसर व टोकावर काळसर बूट,अश्या वर्णनाच्या इसमाची बेवारस मृतदेह मिळाला असून अद्याप ओळख पटली नाही. घटनास्थळी डॉग स्कॉड(जंजिर डॉग) बोलाविण्यात आला होता. तसेच फॉरेन्सिक लॅब वाहन घटनास्थळी आले होते. मरणाचे कारण समजून आले नसून मृतकाचे व्हिसेरा, डी एन ए सॅम्पल काढण्यात आले आहे. संशयास्पद वस्तू वगैरे घटनाथळी मिळून आली नसून नातेवाईकांनी रावेर पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन
भेट देणारे अधिकारी उपस्थित अधिक्षक नरेंद्र पिंगळे,
पो.नि. रामदास वाकोडे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी केले आहे. याबाबत रावेर पोलिसात विश्राम जिंसी पोलीस पाटील गोकुळ प्रताप पाटील यांनी खबर दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा