Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

संग्रामपुर न्यायालय फोडून साहित्य़ तर घरफोडीत रोख रक्कम, दागिने, लंपास ; संग्रामपूर शहरात व परिसरात चोरांची दहशत ; संग्रामपुर येथील प्रकार एकाच रात्री 3-4 ठिकाणी घडल्या चोरीची घटना



प्रतिनिधी:बुलढाना जिल्ह्यातील संग्रामपुर येथील न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीती आतिल साहित्य़ तर एका घरातून चोरटय़ांनी रोख रककमसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि.20 मार्च रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली आहे . शहरात एकाच रात्री 3-4 ठिकाणच्या घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संग्रामपुर येथील पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानमधील सिंध्दाथ इंगळे हे पत्नी मुलासह अकोला येथे रुग्णालयात गेल्यामुळे एक मुलगी एकटीच असल्यामुळे शेजारीच्या घरात असल्यामुळे याचे घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत, मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सामानाची नासधूस केली. 

कपाटातील असलेले नगदी 23 हजार रूपये व सोन्याचे दाग दागिनेसह एकुण 50 हजार रुपयाचा माल त्यांनी लंपास केले आहे. चोरी करतेवेळी चोरटय़ांनी गल्लीतील घरांच्या कडय़ा बाहेरून लावल्या होत्या. गेल्या कित्येक महिन्यापासुन संग्रामपुर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी न्यायालयात चोरी केली. तालुक्यातील चोरटयांनी मंदिरे दानपेटया घटना ताजी असताना आज रात्री त्यानी चक्क न्यायमंदिराच फोडले. 20 मार्चच्या रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी न्यायालयाचे कुलुप तोडून इमारतीत प्रवेश करून आतील साहित्य लंपास केले. दरम्यान आवाज आल्याने शेजारील काही नागरिक जागे झाले त्यांनी तामगाव पोलिसांना फोन करून माहिती दिली. 

तसेच शहरातील इतर ठिकाणी हया चोरटयांनी तीन – चार ठिकाणी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र जवळील श्रीहरी ठाकरे यांच्याघरातील कडी कोंयडा तोडुन घरात प्रवेश केला त्या दरम्यान त्यांच्या शेजारील रमराव देशमुख यांची मुलगी अभ्यास करीत होती तिच्या निदर्शनास सदर अज्ञात चोर आले असता तिने आपल्या वडिलांना ही माहिती दिली व रंगराव देशमुख यांनी ऋतुपर्ण ठाकरे यांना फोनवर कॉल करून सदर सोडा विषयी माहिती देऊन परिसरात आरडाओरड सुरू केल्यामुळे या चोरांनी पळ काढली होती. यामध्ये 8 ते 10 जनांचा चडडी बिनयान शस्त्रधारी चोळी असल्याचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. त्यांनतर बुलडाणा येथून श्वान पथक पाचारण झाले, रानी नामक श्वान पथकाने याप्रकरणी श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी प्राचारण करण्यात आले होते. 

याबाबत अज्ञात चोरांविरुद्ध तामगांव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. एकाच रात्री तीन-चार ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात चोरीचा प्रमाण वाढत असतांना आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध