Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोना व्हायरस चा सामना करण्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल जग विख्यात उल्का नगरी लोणार मध्ये जमाव बंदी लागू



प्रशासनाच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार लोणार बाजार पेठ बंद ठेवण्याचे आव्हान बुलढाना जिल्ह्यातील लोणार-शासनाच्या आदेशानुसार स्थानीक पोलीस प्रशासन,महसुल

प्रशासन,नगरपरीषद ,वैद्यकीय अधीकारी यांनी शहरातील सर्व बाजारपेठ दिनांक २२ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आव्हान करुन बाजार पेठ बंद केली. स्थानीक बसस्थानका समोरुन लाँऊडस्पीकर द्वारे 

व्यावासायीकांना शासनाच्या आदेशानुसार दि.२२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली प्रतीष्ठाणे बंद करण्याचे आव्हान करण्यात आले.अत्यवश्यक सेवा वगळून कोराणु विषाणू ज्या ज्या सार्वजनिक ठीकाणी आहेत ते या जनता कर्फ्यु मुळे नष्ट होतील या आनूषंगाने हा बंद करण्यात आला.तसेच जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.तरी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करुन शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आव्हान तसीलदार सैपन नदाफ मुख्यधीकारी विठ्ल केदारे,ठाणेदार रविंन्द्र देशमुख ,वैद्यकीय अधीक्षक शहा यांच्यसह कर्मचारी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध