Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

ढोरपगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम तपासणी शिवाय गावात प्रवेश नाही



खामगाव प्रतिनिधी:खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे कोरोणा या विषाणूजन्य आजाराने जगभरात खळबळ उडविली आहे, महाराष्ट्रातही या आजाराचा प्रसार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, बाहेरगावाहून येणाऱ्या मुळे हा आजार बळावत असल्याची शक्यता आहे त्यामुळे खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे बाहेरगावाहून प्रमुख्याने पुणे आणि मुंबई येथून येणाऱ्यांनी तपासणीशिवाय गावात प्रवेश करू नये असे आवाहन केले 

आहे,शिवाय कोरोणा बाबत खबरदारी म्हणून गावात दवंडी देऊन जनजागृती करण्यात येत आहे कोरोणा व्हायरस या आजारामुळे मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला पुणे येथेही या आजाराची लागण झालेली रुग्ण आढळून आले आहे, 

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या आजाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याने राज्यातील शाळा बंद करण्यात आले आहेत याशिवाय प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य 

शासनाकडून देण्यात आले आहे,या प्राभूमीवर खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील सरपंचा सौ उषाबाई अविनाश तांगडे व ग्रामपंचायत चे सचिव ए आर धदंर यांनी गावात दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे यामध्ये ढोरपगाव गावात प्रत्येक चौकात कोरोणा व्हायरस चे पोषटर लावुन कोरोणा ची माहिती ए आर धदंर ग्राम पंचायत सचिव अमोल तायडे कैलास मानकर श्रीकृष्ण हेलोडे देत आहे, स्वच्छता राखणे गर्दी करण्यास मज्जाव केला आहे सर्दी खोकला आणि ताप असल्यास तात्काळ उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे,यावेळी उपसरपंच आनंदा धुरंधर प्रकाश खेडकर ज्ञानदेव मुढे सौ गौकर्णाबाई तायडे मनोहर तागंडे सौ ताईबाई दाडंगे सौ सुनिताताई कवळे सौ अंजनाताई माठे याची उपस्थित होतेअशी माहिती ग्रामपंचायत सचिव ए आर धंदर यांनी दिली आहे,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध