Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

जामनेरात 34 बेड आणि 20 व्हेंटिलेटर असलेला आयसीयु विभाग लवकरच आपल्या सेवेत:- आ.गिरीष महाजन


जळगाव प्रतिनिधी:कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर या हॉस्पिटलची सुविधा तातडीने देण्याची भुमिका मा. मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी घेतली आहे.

‘कोरोना’ संसंर्गाविरोधातील लढयासाठी जळगांव जिल्हयाचे माजी पालमंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनीही कंबर कसली आहे. त्यांच्या पुढाकाराने ‘ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पीटल’चा आय.सी.यु. विभाग लवकरच सुरू होणार असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्वतः आमदार गिरीष महाजन हे रोज जातीने हजर राहून कामाची पाहणी आपल्या देखरेखीखाली करून घेत आहेत .

जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना चांगली वैद्यकिय सेवा मिळावी यासाठी औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पीटलच्या धर्तीवर जामनेर येथे शंभर बेडचे हॉस्पीटल उभारण्याचे काम आमदार गिरीष महाजनांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. हॉस्पीटल आणि नर्सिंग महाविद्यालय या ठिकाणी असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर या हॉस्पिटलची सुविधा तातडीने देण्याची भुमिका गिरीष महाजन यांनी घेतली आहे.

यासंदर्भात गिरीष महाजन यांनी सांगितले की,सद्य स्थितीत ‘कोरोनामुळे 34 बेड व वीस व्हेंटीलेटर असलेला आयसीयु विभाग तातडीने सुरू करण्यात येणार आहे. रात्रंदिवस हे काम युद्ध पातळीवर सुरूच असून आपण स्वत: या ठिकाणी कामावर लक्ष ठेवून आहोत. 

येत्या काही दिवसात त्याचे काम पूर्ण होवून बाहयरूग्ण तपासणी व वीस व्हेंटीलेटर असलेले 34 बेडचा “आयसीयु’ विभाग सुरू करणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध