Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ मार्च, २०२०
बुलडाणा जिल्ह्यात ‘मीच माझा रक्षक’ ची पोलीस अधिक्षकांसह पोलिसांनी घेतली शपथ
कोरोना शी लढतांना सुरक्षिततेची घेतली शपथ
बुलडाणा खामगाव प्रतिनिधी:
कोरोनापासून खबरदारी म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माझे आरोग्य माझी जबाबदारी म्हणून मीच माझा रक्षक सुचवलेल्या या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे आपले कर्तव्य उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. त्यांचे मनोबल आणि धैर्य वाढावे या दृष्टीने बुलडाणा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यानी आपल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सोबत ‘मीच माझा रक्षक’ बाबत शपथ घेतली.यावेळी स्वतः जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना माझे आरोग्य माझी जबाबदारी म्हणून शपथ दिली.
कोरोनाचा थैमान वाढविण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे, कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी 21 दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे ,घराबाहेर पडू नये, जमाव होवू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या साठीच अहोरात्र सेवा देणारे पोलीस सुरक्षित राहवेत यासाठी माझे आरोग्य माझी जबाबदारी म्हणून मीच माझा रक्षक अशी संकल्पना आरोग्य मंत्री टोपे यांनी सुचवल्या आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी मीच माझा रक्षक बाबत शपथ दिली.
जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये अशी शपथ दिले जाणार आहे.म्हणून कर्तव्यावर असणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांन...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर वकील संघाच्या निवडणुकीत अँड. प्रल्हाद महाजन यांनी अक्षरशः झंझावाती कामगिरी करत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. नि...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा