Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

जळगाव शहरातील काही भागात जनतेकडून ‘लॉकडाऊन’चा फज्जा


जळगाव प्रतिनिधी:जळगाव शहरात लॉकडाऊनमुळे मुख्य रस्त्यांवर अत्यंत शुकशुकाट दिसत असून फक्त अत्यावश्यक सेवा करणारी जनताच या रस्त्यांवर वावरताना दिसत आहे.विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना शहरातील मुख्य चौकांवर पोलिसांचा दंडुका बसत आहेत.मात्र असे असले तरी शहरातील इतर भागांमध्ये लॉकडाऊनचा फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांमध्ये कोरोनाचे जराही गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.तसेच पोलिस यंत्रणेकडूनही काही भागांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे.

दाणा बाजार परिसरात सर्व नियमांची पायमल्ली केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) या गोष्टी पाळल्या जात नाहीये व प्रशासनाकडून देखील या ठिकाणी कुठल्याही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत.

तसेच शहरातील शाहू नगर भागातील नागरिकांना परिस्थितीचे कुठलेही गांभीर्य दिसत नाही. या ठिकाणी लोक दैनंदिन जीवनासारखे वावरतांना नजरेस पडत आहेत. एका ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव असतांना देखील येथे नागरिक घोळक्याने गप्पा मारतांना दिसत आहेत.

तर दुसरीकडे मात्र शहरातील पेट्रोल पंप सद्यस्थितीत नेमून दिलेल्या वेळेतच सुरू आहेत त्यामुळे दुपारच्या वेळेला पेट्रोल पंप बंद स्थितीत असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध