Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ मार्च, २०२०

अर्थसंकल्पात पाडळसरे धरणाला 40 कोटी निधीतून प्रस्तंभ काम होणार सुरू


प्रतिनिधी:अमळनेर:अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी निधीतून 40 कोटी निधी मिळाले यामुळे रखडलेले काम सुरु होणार आहे. लवकरच धरणाचे काम सुरु होणार अशी माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पातील निधीतून 40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याने धरणाचे काम सुरु होणार अशी आशा पल्लवित झाली हे. अर्थसंकल्पात केलेली तरतुदीनुसार रक्कम जलसंपदा विभागाला मिळाल्यावर कोणत्याही स्थितीत काम सुरु होईल.

धरणाला निधी मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सातत्याने जलसंपदा विभाग व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यावर सॉफ्ट लोन ( अल्पदाराचे कर्ज) त्यानुसार शासन जलसंपदा विभागाला उपलब्ध करून देण्यावर भर आहे 

या निधीतून जलसंपदा विभाग इतर कामांसाठी पैसे वापरणार नाही याचीही दक्षता आमदार अनिल पाटील घेणार आहेत.

जलसिंचन आणि पेयजल वाढणार - या निधीतून धरणाचे काम मार्गी लागल्यास सध्या असलेल्या १७  किलोमीटर पर्यँत असलेले बॅक वॉटर जळोद पर्यँत जाऊन शहराची आणि नदी काठच्या गावांची पाणी टंचाई कायम स्वरूपी दूर होणार आहे,
निम्न तापी प्रकल्पाला निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने गेल्या एक वर्ष पासून काम बंद केले आहे याठिकाणची सर्व अवजड बांधकाम साहित्य कंत्राटदाराने इतरत्र हलवले होते. ते परत आणले जाईल त्यामुळे या कंत्राटदाराशी जलसंपदा विभागमार्फत संपर्क करण्यात आला असून धरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने  तात्काळ बांधकाम साहित्य प्रकल्पाच्या ठिकाणी आणावे असे कळवण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध