Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ मार्च, २०२०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल.



प्रतिनिधी:आपल्या संघटनेने दि. 03. 02. 2020 रोजी मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त व नियोजन विभाग व मा. ना. श्रीमती यशोमती ठाकूर,  मंत्री, महिला व बालविकास यांच्याशी मानधनवाढीची थकीत रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्वरित  अदा करण्याबाबत चर्चा करून आग्रही मागणी केली. 

सदर चर्चेनुसार आणि सततच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना आक्टोंबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीतील मानधनवाढीची थकीत रक्कम देण्यासाठी लागणरा निधी राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्याकडे वितरित केल्याबाबत मा. आयुक्त, एबाविसेयो, रायगड भवन, नवी मुंबई यांनी दि.05.03.2020 रोजी आदेशित केले आहे. 

सदर आदेशात मानधनवाढीची थकबाकी 31 मार्च 2020 रोजीपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अदा करावी. असेही आदेशात नमूद केले आहे. मा. आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मानधनवाढीची थकीत रक्कम लवकरच जमा होईल. 

यापुढेही प्रलंबित मागण्यांसाठी आपल्याला एकजुटीने सततचा प्रयत्न करून मागण्या मंजूर करून पदरात पाडून घ्याव्या लागतील. यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देणे गरजेचे आहे आणि संघटनेच्या निर्णयानुसार आपली वर्गणी व लढानिधी संघटनेकडे भरणेही आवश्यक आहे. तरी सभासद फी व लढानिधी विनाविलंब भरणा करावी हि विनंती.

सोबत- थकबाकी देण्याबाबतचे मा.आयुक्त,एबाविसेयो यांचे पत्र जोडले आहे.

मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते...








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध