Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या उत्सवास आज गारखेडा ( ता. रावेर ) येथून प्रारंभ झाला .
सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या उत्सवास आज गारखेडा ( ता. रावेर ) येथून प्रारंभ झाला .
रावेर:प्रतिनिधी:आदिवासी समाज बांधव, महिला, युवक, युवती पारंपरिक वेशभुषेत ढोल, बासरी, काश्याच्या थाळीचा झंकार व नृत्य करीत महाराष्ट्र, मध्य - प्रदेशातून गारखेडा येथे आले होते .
रंगा बरोबरच विविध दुकाने थाटली होती . भोंगऱ्या निमित्त ढोल ताशा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आदिवासींनी एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहात भोंगऱ्या उत्सव साजरा केला .
पाल येथून जवळच असलेल्या गारखेडा येथे होळी निमीत्त भोंगऱ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या उत्सवात वीस हजाराच्यावर आदिवासी बांधव सामिल झाले होते . परिसरातील पहिलाच भोंगऱ्या बाजार गारखेडा येथे आज भरला होता . भोंगऱ्या उत्सवाची सुरवात परमपूज्य लक्ष्मण चेतन्य बापूजी आणि तंट्यामामा यांची प्रतिमा पूजन करून सुरवात करण्यात आली .
दुकाने थाटली
भोंगर्या बाजारात विविध प्रकारचे रंग होळीसाठी नैवेद्य म्हणून लागणारे गोड शेव, खजूर ,खडीसाखर, फुटाणे,हार कंगन,लहान मुलांचे खेळणी, गृह उपयोगी साहित्प आदिवासी महिलांचे चे सौदर्य प्रसाधने,दुकाने मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती,
पाल येथून जवळच गारखेडा या आदिवासी गावात यावर्षी प्रथमच भोंगऱ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यात ढोल, नृत्य स्पर्धा ठेवण्यात आली होती पहिले बक्षीस पाच हजार,दुसरे बक्षीस,तीन हजार,तिसरे बक्षीस दोन हजार व सहभागी ढोल पथकांना पाचशे रुपये देण्याचे आयोजन गारखेडा भोंगऱ्या उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते . रात्री उशीरा पर्यन्त ही स्पर्धा सुरू होती . अशी माहिती समिती चे सरपंच जवानसिंग बारेला, उपसरपंच इरफान तडवी , रतन बारेला ,भीमा बारेला,गिरसिंग बारेला, रमेश बारेला सुरसिंग बारेला यांनी या स्पर्धेचे नियोजन केले .
उद्या बुधवार रोजी मध्यप्रदेशातील गाडग्याआम, गुरूवार रोजी जामन्या गडऱ्या,सोमवार रोजी पडल्या,शुक्रवार रोजी मोरव्हाल ,शनिवारी बोरी तांबी, रविवार हेलपदावा,सोमवार पाडल्या अश्या प्रकारे आठवडाभर भोंगऱ्या बाजार भरणार आहे .
एक आठवडा आधी आमंत्रण देण्याची वेगळी प्रथा भोंगऱ्या उत्सवानिमित्त एक आठवडा आधी आमंत्रण देण्याची वेगळी प्रथा या समाज बांधवांची आहे . त्याला गुळाल्या बाजार असे म्हणतात आदिवासी बांधव एकमेकांना गुलालाचा टिळा कपाळावर लावून (नेवता ) आमंत्रण देतात
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा