Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
समाजभगिनीची बांधकाम सभापती निवडीचा आम्हास सार्थ अभिमानच... श्री अर्जुनभोई, मुंबई
समाजभगिनीची बांधकाम सभापती निवडीचा आम्हास सार्थ अभिमानच... श्री अर्जुनभोई, मुंबई
पुणे/मुंबई:महिलादिनाच्या निमित्ताने आज आमच्या महिलाभगिनीचा जो सत्कार सत्तेच्यापटलावर होत आहे त्यात आम्हाला आनंद तर होत आहे पण एक कमतरता ही भासत आहे आणि ती म्हणजे मच्छीमार व्यवसायातील, तलाव ठेकापातळीवरील, पुणे विभागातील मच्छीमार किंग समजले गेलेले कै महेंद्रभाऊ मल्लाव-भोई यांची... भुतकाळातील काही आठवणींवर नजर टाकतांना लेखन करतो आणि त्याचे आम्ही साक्षीदार ही आहोत की, राष्ट्रीय मत्सजिवी विभागाचे अर्थात फिश्कोकोफेड दिल्लीचे माजी राष्ट्रीयअध्यक्ष आणि विद्यमान विदर्भ विभागातील नागपूर विदर्भ मच्छीमार संघाचे अध्यक्ष मा प्रकाशजी लोणारेसाहेब यांच्या द्वारा मच्छीमार व्यवसायातील मदतीचा हात हा कै महेंद्रभाऊ मल्लाव-भोई यांना दिल्याचा सर्वश्रृत आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार ही आहोत.
आज कै महेंद्रभाऊ मल्लाव-भोई यांच्या सुविद्यपत्नी श्रीमती संगिताताई महेंद्रभाऊ मल्लाव-भोई यांची पुणे विभागातील शिरुर नगरपरिषदेच्या बांधकाम सभापतीपदी निवड झाल्याबाबत संपुर्ण महाराष्ट्रातील भोईसमाज त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे आणि अभिमानाची पताकाही खांद्यावर फडकवत आहे.
समाजपटलावरील सत्कारमुर्ती श्रीमती संगिताताई महेंद्रभाऊ मल्लाव-भोई यांच्याकडून विभागातील समाजाची सामाजिकसेवा ही घडेल यात आम्हाला तिळमात्र शंका नाही आणि ती घडविण्यासाठी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना ही करत आहोत त्या आमच्या समाजाच्या महिला भगिनी आहेत याचा सार्थ अभिमानच आम्हाला वाटत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा