Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
आपल्या सौजन्यशील वागणुकी द्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविणाऱ्या वाहकांचा विभागीय नियंत्रकाच्या हस्ते सत्कार
आपल्या सौजन्यशील वागणुकी द्वारे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविणाऱ्या वाहकांचा विभागीय नियंत्रकाच्या हस्ते सत्कार
शेगाव:प्रतिनिधी:आपल्या सौजन्यशील वागणुकी मुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकणाऱ्या तिघा वाहकांचा विभागीय नियंत्रक संदीप राऊलवार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार सन्मान करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शेगाव आगारामध्ये एक मार्च ते 31 मार्च व एक एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान प्रवासी वाढवा उत्पन्न वाढवा अभियान राबविण्यात येत आहे
या अभियानादरम्यान शेगाव बस आगारातील वाहक पीएम बोराखडे सौ दिपाली गावंडे व सौ प्रिया तायडे या तिघा वाहकांनी आपल्या सौजन्यशील वागणुकीमुळे जास्तीत जास्त प्रवाशांना एसटी बस मधून प्रवास करण्यास प्रोत्साहित केले व त्याद्वारे एसटी
महामंडळाला भरीव असे उत्पन्न मिळवून दिले त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक संदीप राऊलवार यांनी शेगाव येथे बस स्थानकाला भेट देऊन त्यांचा सत्कार केला याप्रसंगी सहाय्यक कार्याधीक्षक बोदडे शेगाव बस आगार प्रमुख सुभाष भीवटे सुरक्षा व दक्षता अधिकारी वानखडे शेगाव बस स्थानक प्रमुख मुसळे लेखाकार अशोक देशमुख यांच्यासह पत्रकार अरुण भटकर व प्रशांत खत्री शेगाव बस आगारातील चालक-वाहक कर्मचारी वृंद व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा