Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
तरूण तरुणीची रेल्वे रुळावर आत्महत्या
शेगांव:प्रतिनिधी:शेगांव शहरातील सरकारी फैल या भागातील तरूण व तरुणीची रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री ११:३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
रेल्वे रूळावर आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय १७ वर्ष व त्याचे नाव राम अनिल नामदास तर तरुणीचे वय १५ वर्ष व नाव राधीका अनिल करडे असून या दोन्ही तरुण-तरुणीने शेगाव शहरातील चारमोरी जवळ खंबा किलोमीटर ५४८, १०-१२ च्या मध्ये आत्महत्या केल्याचे दिसून आले.
या भागात वरील प्रमाणे अंतरावर मुलगा व मुलगी यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याच्या मेमोवरून ए.पी.आय.सागर गोळे, पो.हे.कॉ.बाळु खिराडे,ज्योती खिराडे,पो.शि.अशांत चोरटे सर्व घटनास्थळावर पोहोचले व पंचनामा करुन तरुण-तरुणींच्या शरीराचे शवविच्छेदन केल्यानंतर शरीर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
संपूर्ण घटनेचा तपास पी.एस.आय.पाणपाटिल हे करत आहेत. मात्र शहरात तरुण-तरुणीहे प्रेमीयुगुला असल्याचे बोलले जात आहे तर पोलिसांनी याबाबत तपासात तसे स्पष्ट झाले नाही असे सांगितले.व घटनास्थळी मोबाईल फुटलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याचेही रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा