Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मार्च, २०२०

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डीजे डिनरला सुप्रसिद्ध मॉडेल, मिसेस वर्ल्ड डॉ. आदिती गोवित्रीकर लावणार हजेरी



धुळे:प्रतिनिधी:दरवर्षीप्रमाणे यंदाही जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात सुरू आहे. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा समारोप उद्या दिनांक 4 मार्च रोजी संध्याकाळी डीजे डिनरने होणार आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या डीजे डिनर या कार्यक्रमाला मिसेस वर्ल्ड तथा अभिनेत्री, मॉडेल  डॉ.आदिती गोवित्रीकर हजेरी लावणार आहेत.  

उद्या संध्याकाळी सहा वाजता कॉलेज कॅम्पसमध्ये होणाऱ्या या धम्माल कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आदिती गोवित्रीकर उपस्थित राहतील. एमबीबीएस विद्यार्थी, विद्यार्थिनीतर्फे आयोजित या डीजे डिनर कार्यक्रमात विद्यार्थी डीजेच्या तालावर थिरकणार आहेत. 

महाविद्यालयातील एम बी बी एस विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारीदेखील या कार्यक्रमात  सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात उत्साह द्विगुणित करण्यासाठी अभिनेत्रीडॉ.आदिती गोवित्रीकर उपस्थित राहणार आहेत. 
जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, सहसचिव संगीताताई पाटील, डॉ.ममता पाटील, अधिष्ठाता डॉ.विजय पाटील, प्रशासन प्रमुख राकेश काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध