Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मार्च, २०२०

भोई समाजाच्या वतिने आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सोमवार दि.०२/०३/२०२० ला शासकीय विश्रामगृहात अकोला येथे युवा शक्तिच्या बुलंद आवाजात तरूण वर्गांनी गर्जना करीत पार पडली


प्रतिनिधी:भोई समाजाच्या वतिने आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सोमवार दि.०२/०३/२०२० ला शासकीय विश्रामगृहात अकोला येथे युवा शक्तिच्या बुलंद आवाजात तरूण वर्गांनी गर्जना करीत श्री.ऊमेशभाऊ नंदाने, आत्मारामजी मात्रे, बंडुभाऊ सुरजुसे, नंदुभाऊ धारपवार आणि सभेचे अध्यक्ष श्री.सखारामजी नेमाडे यांच्या खास मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून राजुभाऊ वानखडे, भास्करराव नंदाने साहेब, दादाराव माहोरे, निलकंठ सुरजुसे,गोविंद सुरजुसे, संतोष श्रीनाथ,श्रावण धारपवार, आनंद मात्रे,सुरेश भारसाकळे, विनोद श्रीनाथ, महादेव माहोरे,संजयभाऊ वाघमारे,विजय श्रीनाथ, श्रीधर साटोटे,शारदाताई भारसाकळे, दुर्गाताई कंडाळे ,जयश्रीताई ढोले, संदिप धारपवार, मोहन मात्रे आणि आमचे लाडके शब्दरूपी वाराने घायाळ करणारे गजानन जावरेअशा अनेक जेष्ठ आणि तरूण भोई समाज कार्यकर्त्यांनी बैठकीला धगधगत्या ज्वलंत आणि बुलंद आवाजात सभेला हजेरी लावली.

सखारामजी नेमाडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाची आजची दैनंदिन अवस्था यावर सगळयांचे लक्ष वेधले.

सभेचे प्रमुख पाहुणे श्री.

बंडुभाऊ सुरजुसे यांनी महाराष्ट्र भोई समाज फाऊंडेशन संदर्भात मोलाची माहिती देवुन भोई समाजाला कशा प्रकारे फायदा होईल हे त्यांनी त्यांच्या भाषणातुन ज्वलंत उदाहरणासह सांगितले.

नंदुभाऊ धारपवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
जयश्रीताई ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या विशेष शैलीत समाजकार्य कसे करावे खनखाऊन सांगितले.

दादाराव माहोरे भास्करराव नंदाने, उमेशभाऊ नंदाने, आत्मारामजी मात्रे साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

बरेच भोई समाज कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून समाज हितासाठी एक संघ भोई, समाजाशी एक निष्ठ राहून समाजाच्या हक्कासाठी, सतत प्रयत्नशील राहू असा ठामपणे जणू संदेशच दिला.पुढची सभा हि आरक्षणा संदर्भात राहिल.या सभेचे आयोजन लवकरच करण्यात येईल.

शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादाराव माहोरे यांनी छोट्याशा आणि सुंदर शब्दांत  केले.                 
          
                                     
             
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध