Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
सत्रासेन ग्रामीण भागात आजही रुढी-परंपरा प्रमाणे होळी हा सण साजरा
सत्रासेन प्रतिनिधी:सुभाष पाटील
होळी हा भारतामधील एक लोकप्रिय सण आहे. होळी हा सण सञासेन येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आपल्या रूढी परंपरा प्रमाणे साजरा करण्यात आला. उत्सव फाल्गुन महिन्यात येतो.या सणाला 'रंगपंचमी','होळी पौर्णिमा','शिमगा' असेही म्हटले जाते.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण हा रंगांचा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.
वरिष्ठांना विचारले असता हा सण का साजरा करतात त्यांनी या सणाबद्दल सांगितले की हिरण्यकशपू नावाचा एक अहंकारी राजा होता. त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णु देवाचा मोठा भक्त होता.त्याने प्रल्हादला देवाची भक्ति करण्यपासून थांबवले,पण प्रल्हाद काय थांबला नाही.हिरण्यकशपूची बहिण होलिका हिला आगीपासून सुरक्षित राहण्याचा वरदान होता.त्यामुळे हिरण्यकशपूने अग्नी पेटवून त्यामध्ये होलिकेला प्रल्हादला मांडीवर घेऊन बसायला लावले.आपल्या वरदानाचा गैरवापर केल्यामुळे होलिका दहन झाली व प्रल्हाद सुखरूप राहिला.असे मानले जाते की या दिवसापासून होळी हा सण साजरा करतात.
सत्रासेन ग्रामस्थांनी होळी दहनला लाकडाच्या ढीगापासून होलिका तयार केली होती.संध्याकाळी तिची पूजा झाल्यानंतर तिला पेटवण्यात आले. प्रत्येकाच्या घराची पूरणपोळी, करंजी आणि इतर गोड पदार्थ याचे होळीला रुढी-परंपरा प्रमाणे नैवद्य देतांना पाहण्यास मिळाले.
दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे म्हणजेच धूलिवंदनाला लोक एकमेकांमधील रूसवे फुगवे विसरून आनंदाने नाचत गाजत,एकमेकांना रंग लावत हा सण उत्साहाने साजरा करतात.
भारताच्या विविध भागांमध्ये होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केली जाते.
तसेच आपल्या सत्रासेन गावांमध्ये आपल्या परंपरा होळी दहन सण साजरा करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा