Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
जलयुक्त शिवार अंतर्गत खेडी येथे चिखली नदीवर साठवण बंधाऱ्याचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
जलयुक्त शिवार अंतर्गत खेडी येथे चिखली नदीवर साठवण बंधाऱ्याचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
अमळनेर प्रतिनिधी:रविवारी जलयुक्त शिवार अभियायानांतर्गत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण (ल पा) विभाग जळगाव यांच्या माध्यमातून तालुक्यातील चिखली नदीवर बंधारा होत आहे. यासाठी 19 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या साठवण बंधाऱ्यांची लांबी 36 मीटर असून त्याची जमिनीपासून उंची 2 मीटर आहे. या बंधाऱ्यास दीड मीटर उंचीवर तीन दरवाजे असून त्यांची क्षमता 18.14 टीसीएम इतकी आहे.
यावेळी पारोळा पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील इंजिनीयर वाल्मीक पाटील बाळू आबा सरपंच खेडी ग्रामपंचायत ज्ञानेश्वर शिंदे, संजय पवार, विलास शिंदे, सुनिल पवार, किशोर पवार, किरण पाटील पिंटू पाटील नामदेव बाबा पाटील शांताराम पवार रावसाहेब पवार राजेंद्र पवार तुळशीदास पवार शांताराम शिंदे निलेश पवार दीपक पाटील पाटील कैलास सर समाधान पवार भानुदास पवार राजेंद्र पाटील प्रभू हे सर्व उपस्थित होते.
याचवेळी महिला दिनानिमित्त आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे प्रतिमापूजन केले. यावेळी शकुंतला पाटील अंगणवाडी सेविका कल्पना बोरसे आशा स्वयंसेविका योगिता पाटील मदतनीस पाटील छाया पाटील किशोरी पवार अर्चना पाटील शायरा पिंजारी साक्षी पाटील पूजा पाटील आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा