Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
आमदारांच्या सहकार्याने एमडी डॉक्टरांची सेवा समर्पित आजपासून सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू, प्रशासनाला मदत
आमदारांच्या सहकार्याने एमडी डॉक्टरांची सेवा समर्पित आजपासून सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू, प्रशासनाला मदत
प्रतिनिधी अमळनेर आमदार अनिल पाटील सहकार्याने शहरातील एम डी डॉक्टर्स यांनी सेवा समर्पित केली असून आजपासून दि. 27 पासून सर्दी ताप खोकला तपासणी सेवा सुरू करण्यात येत असून शहरातील सर्व एम डी डॉक्टर्स व आय एम ए संघटनेचे सदस्य प्रशासनाला मदत करणार आहेत. त्यात सर्दी, ताप, खोकला, असणाऱ्या पेशंटची तपासणी करण्यात येणार आहेत. व गोळ्या औषधे लिहून देणार आहेत.
आमदार अनिल पाटील यांनी घेतलेल्या पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली याठिकाणी आमदार अनिल पाटील प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ अविनाश जोशी, डॉ संदीप जोशी, डॉ निखिल बहुगुणे, डॉ किरण बडगुजर, प्रशांत शिंदे, हे उपस्थित होते.
शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना या ठिकाणी पाठवण्याची सूचना करण्यात येणार असुन त्या सर्वांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी अशा लक्षणांची रुग्ण इंदिरा गांधी शाळेत होणार आहे. याठिकाणी इतर तपासण्या होणार नाहीत त्या रुग्णांनी येऊ नये.सर्दी खोकला ताप अशा लक्षणे आढळलेल्या सर्व रुग्णांना याठिकाणी एकत्रित करण्यात येणार असून अशा रुग्णांची तपासणी इंदिरा गांधी शाळेत सकाळी 10 ते 1 तपासणी होणार आहे. विनाकारण तपासायला येणार्यांना प्रवेश दिला जाणार नाही याठिकाणी प्रांताधिकारी सीमा अहिरे या सर्व विखुरलेले पेन्शट एकत्र करून त्यांच्या तपासण्या करून घेणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी या सर्व एमडी डॉक्टर्सशी चर्चा करून गुरुवारी प्रांताधिकारी व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली व त्यात येथील डॉक्टर्स शासनाला मदत म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या आग्रहाने एक विनामूल्य सेवा करण्यासाठी तयार झाले आहेत. शहरात व तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेकडून एव्हडे आव्हान स्वीकारले जाणार नाही म्हणून आमदार पाटील यांनी स्थानिक जनतेच्या सेवेकरिता व जास्त कोरोना पसरू नये यासाठी ही उपाययोजना सुरू केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा