Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोना वार्डात दाखल एका संशयिताचा मृत्यू



जळगाव:प्रतिनिधी: जळगाव जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात ऍडमिट असलेल्या एका 52 वर्षीय रुग्णाचा 30 रोजी रात्री 11 वाजता मृत्यू झाला आहे. 

या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल औरंगाबाद येथील शासकीय  रुग्णालयात  तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे., अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. 

अहवाल येणे अद्याप बाकी- मेहरुनमधीलमधील कोरोना बाधिताच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

दरम्यान, मेहरुनमधील त्या कोरोना बाधित रुग्नाचे नातलग व संपर्कातील 23 जणांसह प्रलंबित सर्व 27 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्यामुळे जळगाव शहरासह जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये जामनेरातील नातेवाईकांचा ही समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध