Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

करोनाची लक्षणं दिल्लीतील निजामुद्दीन परिसर सील



दिल्ली हादरली; २०० लोकांमध्ये करोनाची लक्षणं
नवी दिल्ली : लॉकडाऊनदरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास 200 जणांना करोनाची लक्षणं आढळली असून त्यांना दिल्लीतील वेगवगेळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलंय. यानंतर दिल्लीतील निजामुद्दीन परिसराला पोलिसांनी घेरलं असून पूर्ण नाकाबंदी केली आहे. करोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या संपूर्ण परिसरावर पोलिसांकडून ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे.  दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान निजामुद्दीनमध्ये धार्मिक सभा आयोजित केल्याप्रकरणी मरकजच्या मौलानांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

लॉकडाऊनदरम्यान निजामुद्दीनमध्ये एका धार्मिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. ये सर्वजण बांगलादेश, श्रीलंका या देशांतील असल्याचं सांगण्यात येतंय. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घऱी परतले आहेत. ज्या २०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ते सर्वजण मशिदीच्या जवळच वास्तव्याला आहेत. 

रविवारी ३४ लोकांना तर सोमवारी १५० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन वृद्धांचा चार दिवसांत संशयितरित्या मृत्यू झाला आहे. पण त्यांना करोनाची लागण झाली होती की नाही? हे स्पष्ट होऊ शकलं नाही. पण या कार्यक्रमात सहभागी झालेल्या २०० जणांना सर्दी-खोकला झाल्याचं समोर आलंय. यानंतर दिल्लीतील वेगवगेळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलंय. निजामुद्दीनमधील तबलीगी मरकजमध्ये आलेले दोन वृद्ध ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी एक जण तामिळनाडू तर दुसरा काश्मीर खोऱ्यातील राहणार होता. एकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने तर दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू करोनाच्या धसका घेतल्याने झाल्याचं बोललं जातंय.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या २०० जणांपैकी ६ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याचं बोललं जातंय. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सर्वच्या सर्व २०० जणांचे वय हे ६०च्या वर आहे. आम्हाला यासंदर्भात कुठलीही माहिती नाहीए, असं निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या प्रवक्त्याने सांगितलं.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध