Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावात सर्वत्र सॅनिटाझर ,टीसीएल ,सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्यात आली
शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावात सर्वत्र सॅनिटाझर ,टीसीएल ,सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्यात आली
उंटावद:(प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावात सर्वत्र सॅनिटाझर ,टीसीएल ,सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्यात आल
गावातील गटार ,सार्वजनिक मुतारी व शौचालय येथे कीटक नाशक ,जंतू नाशक फवारणी करण्यात आली.यासाठी ग्रामपंचायत, सरपंच ,ग्रामसेवक, तलाठी ,शिपाई यांनी पुढाकार घेतला. गावातील मुख्य रस्त्यावर ,गल्लीबोळात ही फवारणी करण्यात आली तसेच नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी आपण घरातच राहावे अशा सूचना देखील वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना देण्यात येत आहेत.
आपल्या घरी किंवा गावात पुणे ,मुंबई, नाशिक अन्य शहरातून व्यक्ती आल्यास तात्काळ ग्रामपंचायतीला कळवावे. गावात गल्लीबोळात झालेल्या फवारणीने गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात अन्यत्र भागात दिसून येत असतांना उंटावद गावाचे ग्रामसेवक व तलाठी दिवसभर गावातच ठाण मांडून आहेत. यावेळी सरपंच राजकपूर मराठे यांनी सांगितले की गावात १४ एप्रिल पर्यंत अशाच पद्धतीने फवारणी केली जाईल. यावेळी सरपंच राजकपूर मराठे, ग्रामसेवक ,पोलीस पाटील राजेश सातकर, तलाठी ,ग्रामपंचायत कर्मचारी , आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


खूप छान दादा
उत्तर द्याहटवा