Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
नागपुरातील रुग्णालयातून करोनाचे ५ संशयित रुग्ण मेयो हॉस्पिटलमधून पळाले
नागपूर:प्रतिनिधी:कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपुरात कोरोनाबाबत नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रुग्णालयातून 4 रुग्ण पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
शुक्रवारी दुपारी मेयो रुग्णालयात चार जणांना दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णांची चाचणीही करण्यात आली होती. मात्र चाचणीचे रिपोर्ट्स आले नव्हते. चारही जणांनी कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीनं रुग्णालयातून पळ काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार य़ा चार जणांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं.
त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या होत्या. मात्र रिपोर्ट्स न मिळाल्यानं हे चारही रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयातून पळून गेले आहेत. या चारही रुग्णांना शोधून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या 19 वर गेली आहे पुण्यातल्या रुग्णांची संख्या 10वर गेली असून नागपूरातही आणखी दोन जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पुण्यात 311 जणांना देकरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. भारतात आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 'कोरोना'चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा